शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सेरेनाचे लक्ष्य ‘करियर स्लॅम’

By admin | Updated: August 30, 2015 22:39 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स सोमवार पासून सुरु होणाऱ्या अमेरीकन (यूएस) ओपन टेनिस स्पर्धेत कॅलेंडर ग्रँडस्लॅम पुर्ण

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स सोमवार पासून सुरु होणाऱ्या अमेरीकन (यूएस) ओपन टेनिस स्पर्धेत कॅलेंडर ग्रँडस्लॅम पुर्ण करण्याच्या इराद्याने उतरेल. मोसमातील चौथी व शेवटची असलेली ही स्पर्धा जिंकून सेरेनाला दिग्गज टेनिसपटू स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी करण्याची नामी संधी देखील आहे. त्याचबरोबर स्पर्धेत मारिया शारापोवा, सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हीच, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे आणि सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेला स्पेनचा राफेल नदाल यांच्याकडे देखील सर्वांचे लक्ष असेल.घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सेरेनाकडे यूएस ओपनमध्ये २७ वर्षांत पहिल्यांदा कॅलेंडर ग्रँण्डस्लॅम पुर्ण करण्याची संधी चालून आली आहे. याआधीच्या तीन ग्रँडस्लॅममध्ये बाजी मारुन सेरेनाने आपला दबदबा निर्माण केला. महिला गटामध्ये ती अग्रमानांकनासह खेळेल. त्याचवेळी पुरुष गटामध्ये सर्बियाचा नोव्हक जोकोविचला अव्वल मानांकन असून हे दोन्ही खेळाडू स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आपआपल्या गटातील सलामीचा सामना खेळतील. महिला एकेरीमध्ये सेरेनाचा सलामीचा सामना रशियाच्या वितालिया दियातचेंको विरुध्द होईल. करियर ग्रँण्डस्लॅम करण्यात सेरेना यशस्वी ठरल्यास अशी कामगिरी करणारी ती केवळ चौथी खेळाडू ठरेल.