सारबु्रकेन : भारतीय बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने डेन्मार्कच्या आंद्रेस एंटन्सनला सरळ सेटमध्ये पराभूत करीत बिगबर्गर ओपन ग्रां.प्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मागील महिन्यात चीन ताईपे ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या सौरभने उपांत्य फेरीत एंटन्सनला ३९ मिनिटांत २१-१५, २१-१८ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ५७ व्या क्रमांकावर असणाऱ्या सौरभचा सामना आता १६व्या क्रमांकावरील शाई युकी याच्याशी होणार आहे.सौरभचा लहान भाऊ समीर वर्मा याचा उपांत्यफेरीत शाई युकीकडून १८-२१, १५-२१ असा पराभव झाला.(वृत्तसंस्था)
सौरभ वर्मा बिगबर्गर ओपनच्या अंतिम फेरीत
By admin | Updated: November 6, 2016 23:50 IST