शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मिश्र दुहेरीत सानिया विजयी

By admin | Updated: July 10, 2017 01:16 IST

भारताची टेनिस तारका सानिया मिर्झाने येथे विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत तिसरी फेरी गाठली.

लंडन : भारताची टेनिस तारका सानिया मिर्झाने येथे विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत तिसरी फेरी गाठली.सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डोडिग या चौथ्या मानांकित जोडीने मिश्र दुहेरीत युसुके वातानुकी आणि मकोतो निमोमिया या जपानच्या जोडीचा १ तास १८ मिनिटे रंगलेल्या लढतीत ७-६, ६-२ असा पराभव करताना तिसरी फेरी गाठली.भारत आणि क्रोएशियाच्या जोडीने दुसऱ्या फेरीच्या लढतीत सहा वेळेस बिनतोड सर्व्हिस केली तर चार वेळेस दुहेरी चुकाही केल्या. या जोडीला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी आता गत चॅम्पियन हेन्री कोंटीनेन आणि हीथर वॉटसन यांच्याशी दोन हात करावे लागेल. तत्पूर्वी, महिला दुहेरीतही सानिया आणि बेल्जियमची तिची जोडीदार कर्स्टन फ्लिपकेन्स जोडीने नाअ‍ेमी ब्रॉडी आणि हीथर वॉटसन या ब्रिटनच्या जोडीचा पराभव करताना तिसरी फेरी गाठली. या जोडीने एक तास आणि ४५ मिनिटांच्या लढतीत प्रतिस्पर्ध्यांवर ६-३, ३-६, ६-४ अशी मात केली. या जोडीची तिसऱ्या फेरीत स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस आणि तैपईच्या युंग यान चेन या तृतीय मानांकित जोडीविरुद्ध गाठ पडेल.मिश्र दुहेरीत पूवने जपानच्या एरि होजुमीबरोबर पहिल्या फेरीत जेम्स कारेटानी आणि रेनाटा वोराकावा या अमेरिका आणि झेक प्रजासत्ताकच्या जोडीचा ५-७, ६-४, ६-२ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)