शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-हिंगीस यांची विजयी सुरुवात

By admin | Updated: September 4, 2015 23:06 IST

अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने वर्षाच्या अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये अमेरिकेच्या कॅटलिन क्रिस्टन आणि सबरीना संतामारिया

न्यूयॉर्क : अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने वर्षाच्या अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये अमेरिकेच्या कॅटलिन क्रिस्टन आणि सबरीना संतामारिया या जोडीचा पराभव करताना विजयाने जोरदार सुरुवात केली. दरम्यान, भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस आणि त्याचा स्पेनचा जोडीदार वर्दास्को यांनीही आपली आगेकूच कायम ठेवली.या वर्षीच्या विम्बल्डन विजेत्या सानिया आणि हिंगीस या इंडो-स्वीस जोडीने ५६ मिनिटे रंगलेल्या लढतीत अमेरिकेच्या जोडीचे ६-१, ६-२ असे सरळ सेट्समध्ये आव्हान संपुष्टात आणले. विजयी जोडीने एक बिनतोड सर्व्हिस आणि एक विनर्स मारताना एकूण ६१ गुण घेतले, तर कॅटलिन आणि सबरिना जोडीने एकूण ३३ गुण प्राप्त केले. सानिया-हिंगीस यांची पुढील फेरीतील लढत टिमिया बोज्नियाकी आणि चिया जुंग चुआंग यांच्याशी होईल.पुरुष दुहेरीतही भारताच्या लिएंडर पेस याने त्याचा स्पेनचा जोडीदार वर्दास्कोच्या साथीने जर्मनीच्या फ्लोरिन मेयर आणि फ्रँक मोजर जोडीचा ४२ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-२, ६-३ असा पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. पेस आणि वर्डास्को यांनी दोन वेळेस ब्रेक पॉइंट वाचवले आणि त्यादरम्यान त्यांनी जे ब्रेक पॉइंट मिळवले त्यात तीन वेळा त्यांना यश मिळाले. त्याआधी पेसने मार्टिना हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीत आधीच विजयाने सुरुवात केली. आता पेस-वर्दास्को यांचा सामना अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सन आणि सॅम कुएरी या जोडीशी होईल. स्टीव्ह जॉन्सन आणि सॅम कुएरी या जोडीने त्यांच्याच देशाच्या माईक आणि बॉब ब्रायन या अव्वल मानांकित जोडीवर ७-६, ५-७, ६-३ असा सनसनाटी विजय मिळवला. (वृत्तसंस्था)