शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

सानिया, बोपण्णा, पेसचे जोडीदारांसह विजय

By admin | Updated: May 28, 2015 01:37 IST

जगप्रसिद्ध फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी भारतीय जोडींनी कमाल केली. लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या खेळाडूंनी आपल्या जोडीदारांसह विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पॅरिस: जगप्रसिद्ध फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी भारतीय जोडींनी कमाल केली. लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या खेळाडूंनी आपल्या जोडीदारांसह विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारताचा अनुभवी स्टार खेळाडू लिएंडर पेस याने कॅनडाचा त्याचा जोडीदार डॅनियल नेस्टर याच्या साथीने जेम्स डकवर्थ आणि क्रिस गुसियान या जोडीवर मात केली. हा सामना तीन सेटपर्यंत चालला. दुसऱ्या सेटमध्ये पेस-नेस्टर जोडीला संघर्ष करावा लागला. प्रयत्नानंतरही त्यांनी हा सेट ५-७ ने गमावला. अखेर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये त्यांनी मुसंडी मारत ७-५ ने बाजी मारली. सामन्यात पेस-नेस्टर जोडीने पाचपैकी तीन ब्रेक पॉर्इंट वाचवले. आता या जोडीचा सामना एरिक बुटोरॅँक आणि सॅम ग्रोथ किंवा आंद्रे बेगेमन आणि ज्युलियननोल या जोडीविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, भारतीय खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार फ्लोरियन मार्जिया यांनी पहिल्या फेरीत फिलिप क्राजिनोविच आणि व्हिक्टर ट्रायोकी या जोडीचा ५-७, ६-३, ६-४ ने पराभव केला. या पराभवानंतर मार्जिया-ट्रायोकी या जोडीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर महिला गटात, सुपरफॉर्ममध्ये असलेल्या सानियाने तिची जोडीदार मार्टिना हिंगीससोबत शानदार प्रदर्शन केले. हा सामना त्यांनी सहज जिंकला. या जोडीने जर्मनीची ज्युलिया जॉर्जेस आणि चेक गणराज्यची बारबोरा क्रासिकोरा या जोडीचा ६-३, ६-० अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. याबरोबरच त्यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.‘फेड एक्स्प्रेस’ची आगेकूच१७ ग्रॅण्डस्लॅम पटकाविणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सवर ६-२, ७-६ (१), ६-३ ने पराभव केला. दुसऱ्या मानांकित फेडररला दुसऱ्या सेटमध्ये मात्र संघर्ष करावा लागला. ५७ व्या क्रमांकावर असलेल्या मार्सेलविरुद्ध त्याने दोन वेळा सर्व्हिस गमावली. हा सेट टायब्रेकरपर्यंत आला होता. अखेर निर्णायक सेटमध्ये त्याने बहारदार प्रदर्शन करीत बाजी मारली.टेनिससुंदरीही जोरात...टेनिससुंदरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या रशियाच्या मारिया शारापोव्हा हिने विजयी नोंद करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. माजी विजेत्या या खेळाडूने तिच्याच देशाच्या विटालीया डायचेन्को हिचा ६-३, ६-१ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता तिसऱ्या फेरीत तिचा सामना समंथा स्टोसूर हिच्याविरुद्ध होणार आहे. स्टोसूर ही गेल्या वेळची उपविजेती खेळाडू आहे.