शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी रॅम्पवर अवतरले क्रिकेट-बॉलिवूड जगत

By admin | Updated: September 5, 2016 05:49 IST

क्रिकेटपटू युवराज सिंगने मुंबईत आपल्या दिमाखदार फॅशन सोहळ्याच्या निमित्ताने क्रिकेट आणि बॉलिवूड जगताला एकत्र आणून एक चॅरिटी शो सादर केला.

मुंबई : भारताला २०११ चा विश्वचषक जिंकून देण्यात निर्णायक कामगिरी केलेला स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने मुंबईत आपल्या दिमाखदार फॅशन सोहळ्याच्या निमित्ताने क्रिकेट आणि बॉलिवूड जगताला एकत्र आणून एक चॅरिटी शो सादर केला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमातून जमा झालेला सर्व निधी युवराज आपल्या कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या ‘युवीकॅन’ या संस्थेला दान करणार आहे.शनिवारी रात्री मुंबईत एका कार्यक्रमामध्ये युवराजने ‘युवीकॅन फॅशन’ सादर करुन बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील स्टार्सना एकत्रित आणले. युवराजच्या या हटके सोहळ्याने अनेक व्यावसायिक फॅशन शोची हवा काढली. विशेष म्हणजे, महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून सध्या सोशल वेबसाइटवर तुफान फटकेबाजी करणाऱ्या वीरेंद्र सेहवागपर्यंत सर्वांनीच उपस्थिती लावल्याने या कार्यक्रमाला चार चाँद लागले. अमिताभ बच्चनसह दीपिका पदुकोन, अर्जुन रामपाल, फरहान अख्तर, फराह खान, बॉबी देओल यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत होती. तर, दुसरीकडे सेहवागसह ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो, झहीर खान, इशांत शर्मा, रोहित शर्मा, मोहम्मद कैफ, हॉकी कर्णधार पी. आर. श्रीजेश आणि आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार यांनीही आपला जलवा दाखवला. तसेच, भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया, महिला गोल्फर शर्मिला निकोटकर व क्रिकेटपटू आशिष नेहरा यांचीही विशेष उपस्थिती यावेळी होती.दरम्यान, या कार्यक्रमातून मिळणारी निधी कॅन्सरग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या आपल्या ‘युवीकॅन’ संस्थेला देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी युवराजने केली. (वृत्तसंस्था)>२०१२ साली युवीकॅन संस्थेची स्थापना केली, तेव्हा निधी जमा करण्यास मला अनेक अडचणी आल्या. मला एका मोठ्या रकमेची आवश्यकता होती. मला विश्वास आहे की, माझी गोष्ट लोकांना नक्कीच प्रेरित करेल. जीवनात कधीच हार मानू नका. जीवन, साहस आणि प्रेरणा हे आपले ध्येय आहे. - युवराज सिंग