शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

साळगावकरचा ‘शिलाँग’ला झटका!

By admin | Updated: December 31, 2014 23:44 IST

बिकास जयरु आणि गुरजिंदर कुमारने नोंदवलेल्या गोलच्या बळावर गोव्याच्या साळगावकर स्पोटर््स क्लबने शिलाँग लॉजाँगचा २-१ ने पराभव केला.

पणजी : बिकास जयरु आणि गुरजिंदर कुमारने नोंदवलेल्या गोलच्या बळावर गोव्याच्या साळगावकर स्पोटर््स क्लबने शिलाँग लॉजाँगचा २-१ ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेतील ‘ब’ गटातील सामन्यात तीन गुण मिळवले. जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर गुरिंदर कुमार हा ‘सामनावीर’ ठरला. शिलाँगचा एकमेव गोल इन्जुरी वेळेत जॅकब लालरांगबावला याने नोंदवला.वास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या या सामन्यात साळगावकरने शिलॉँगवर सुरुवातीपासून वर्चस्व राखले. त्यांना पाच गोल संधी मिळाल्या होत्या. तर शिलाँग लॉजॉँगला केवळ एकच संधी प्राप्त झाली होती. या सत्राच्या १३ व्या मिनिटाला डॅरल टफीचा जोरकस फटका किंचित गोल पोष्टाबाहेरून गेला आणि ही संधी हुकली. त्यानंतर ३१ व्या मिनिटाला थॉमजंग सिंगचा ३० यार्डवरील जोरकस फटका आडव्या बारला लागून बाहेर गेला. ४३ व्या मिनिटाला शिलाँगच्या आयबर खोनजीयेने साळगावकरच्या डॅरल टफीला डि क्षेत्राबाहेर पाडले त्यामुळे फ्रिकीक देण्यात आली. मात्र, याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. अखेर पहिले सत्र गोलशून्य असे राहिले. दुसऱ्या सत्रात साळगावकरचाच दबदबा दिसून आला. या वेळीसुद्धा त्यांनी पाच संंधी मिळवल्या. ५८ व्या मिनिटाला डॅरेल टफीने दिलेल्या पासवर बिकास जयरूने चेंडूला जाळीची दिशा दाखवीत साळगावकरचा पहिला गोल नोंदवला. त्यानंतर ६७ व्या मिनिटाला साळगावकरने दुसरा गोल नोंदवित आघाडी २-0 वर नेली. या वेळी थॉमजंग सिंगच्या कॉर्नर किकवर गुरजिंदर कुमारने हेडरद्वारे हा गोल नोंदवला. दुसरीकडे, ९३ व्या मिनिटाला (अतिरिक्त वेळ) जॉकाब लालरावंगबवालने साळगावकरचा गोलरक्षक अभिजितला गुंगारा देत चेंडूला जाळीत टाकले व ही आघाडी २-१ अशी कमी केली. (क्रीडा प्रतिनिधी)