शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सायनाचा मी टेम्पररी कोच -विमलकुमार

By admin | Updated: September 3, 2014 02:02 IST

गोपिचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करील असे स्पष्टीकरण माजी बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोन आणि विमल कुमार यांनी खास लोकमतशी बोलताना दिले आहे.

विनय नायडू - मुंबई
भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ही आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी आमच्याकडे आली असून हे सत्र पुरे होताच ती पुन्हा गोपिचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करील असे स्पष्टीकरण माजी बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोन आणि विमल कुमार यांनी खास लोकमतशी बोलताना दिले आहे. सायनाने गोपीचंद यांना सोडले या वृत्तात तथ्य नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.
सायना नेहवालने सोमवारी स्पष्ट केले की, मी विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे. उबेर कप चषक स्पर्धेदरम्यान त्यांनी दिलेल्या टिप्स मला खूपच उपयोगी पडल्या. आगामी आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी मी बेंगलोरमध्ये आले आहे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायचे आहे. वल्र्डकप चॅम्पियनशीप स्पर्धेदरम्यान मी गोपीसरांशी बोललो आणि त्यांनी याला होकार दिला. 
पण विशेष म्हणजे गोपिचंद यांनी हैदराबाद येथे स्पष्ट केले की, सायना विमलकुमार यांच्याकडे प्रशिक्षण घेणार आहे, हे मला वर्तमान पत्रतूनच कळले. पण त्यापुढे त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. 
याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था साफ करताना विमल कुमार यांनी खास लोकमतला सांगितले की, ज्या बातम्या 
समोर येत आहेत त्या निश्चितच निराशाजनक आहेत. कोपनहेगन येथे वर्ल्ड चॅम्पियनशीपदरम्यान 
आम्ही भेटलो. त्यावेळी मी सायना, गोपीचंद आणि राष्ट्रीय निवडकर्ती मधुमिता बिश्त असे चौघे एकत्र बसलो होतो. 
यावेळी बेंगलोरमध्ये सराव शिबीर होणार असल्याचे मला त्यावेळी कळले. सायनाने यावेळी आपण अलिकडील काळातील निकालाबाबत निराश असल्याचे सांगितले. यावेळी तिने आपण बेंगलोरमध्ये माङयाकडे प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. 
याला मी होकार दिला. हे लाँगटर्म प्लॅनिंग नाही. तिला केवळ फ्रेश माईंडने सराव करुन पुनरागमन करायचे आहे.  प्रकाश पदुकोन हे या सराव शिबीरात तिचे मेंटॉर म्हणून काम पाहणार आहेत, त्यांच्या अकादमीनेही सायना आणि गोपी यांच्यात कोणतीही कटुता नसल्याचे म्हंटले आहे. 
 
सायना पदुकोणकडून प्रशिक्षण घेणार
सायना नेहवाल हिने राष्ट्रीय प्रशिक्षक पी़ गोपीचंद यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असताना माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी सायना दोन आठवडे आमच्या अॅकॅडमीत सराव करणार असल्याचे म्हटले आह़े  पदुकोण म्हणाले, ‘‘सायना विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आठवडे आगामी आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी आमच्या अॅकॅडमीत सराव करणार आह़े दरम्यान, पदुकोण हे सायना नेहवालच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावणार आहेत़