बंगलोर : मागील अनेक दिवस दुखापतीमुळे त्रस्त असलेली भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पुढील महिन्यात होणाऱ्या हॉँगकॉँग ओपन सुपर सीरिजद्वारे मैदानावर पुनरागमन करणार आहे.नुकतेच आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या अॅथलिट आयोगाची सदस्य बनलेली सायना दुखापतीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या चायना ओपन व २२ ते २७ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या हॉँगकॉँग ओपन स्पर्धेत आपण खेळणार असल्याचे सायनाने सांगितले.सायना म्हणाली, ‘‘दीड महिन्यानंतर कोर्टवर उतरण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. चायना व हॉँगकॉँग स्पर्धेसाठी मी उपलब्ध असल्याचे त्यांना कळविले आहे. तीन आठवड्यांत माझ्या तंदुरुस्तीचा वेग या स्पर्धेत मी खेळू शकेल का नाही, हे ठरविणार आहे.’’सायनाच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सायनाने दुखापतग्रस्त असताना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, तिला विशेष कामगिरी करता आली नव्हती.(वृत्तसंस्था)
हॉँगकॉँग ओपनमधून सायनाचे कमबॅक
By admin | Updated: October 27, 2016 04:27 IST