शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सायना, सिंधू दुसऱ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 21:27 IST

रियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांनी एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून महिला एकेरीत

एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप : श्रीकांत, ज्वाला-अश्विनी जोडी पराभूत

वुहान (चीन) : रियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांनी एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून महिला एकेरीत अनुक्रमे फित्रीयानी फित्रीयानी व मारिया फेबे कुसुमास्तुतीचा पराभव करून आपले विजयी अभियान सुरू करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे पुरुष एकेरीत के. श्रीकांत, तर महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला पराभव पत्करावा लागला. सायना व सिंधूच्या विजया व्यतिरीक्त भारतीय खेळाडूंसाठी पहिला दिवस निराशाजनक ठरला. पाचवी मानांकित सायनाने पहिल्याच फेरीत इंडोनेशियाच्या फित्रीयानी फित्रीयानीचा २१-१६, २१-१७ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. पुढील फेरीत सायनाची लढत इंडोनेशियाच्या लिंहावेनी फानेत्री आणि थायलंडची नितचानोन जिंदापोल यांच्यातील विजेतीविरुद्ध होईल. पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या मारिया फेबे कुसुमास्तुतीला अर्ध्या तासात २१-१०, २१-१३ गुणांनी नमवित बाहेरचा रस्ता दाखविला. सिंधूची पुढच्या फेरीत चीनी तैपईचर आठवी मानांकित ताई जु यिंगविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे भारताची अव्वल महिला दुहेरीची ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पाला कोरियाच्या चांग ये ना आणि ली सो ही या जोडीकडून १५-२१, ११-१२ असा सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. पुणुष दुहेरीत मनु अत्री व बी सुमीत रेड्डी या जोडीला जापानच्या हिरोयुकी इंडो व केनिची हायाकावा या जोडीकडून १५-२१, १३-२१ पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुषांच्या दुसऱ्या दुहेरीत प्रणव चोपडा व अक्षय देवलकर जोडीला हॉँगकॉँगच्या चिन चुंग व टांग चुनमान कडून १९-२१, १७-२१ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. पुरुषांच्या एकेरीत भारताच्या के. श्रीकांतला पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. आठवा मानांकित श्रीकांतला बिगर मानांकित कोरियाच्या ली डोंग कियूनकडून १ तास १५ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१३, १२-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)