शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सायना उपांत्य फेरीत

By admin | Updated: August 15, 2015 02:03 IST

भारतीय स्टार सायना नेहवाल हिने विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. दोन वेळेची कांस्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व

जकार्ता : भारतीय स्टार सायना नेहवाल हिने विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. दोन वेळेची कांस्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत महिला एकेरीत शुक्रवारी सनसननाटी पराभवाचे तोंड पहावे लागले. त्याआधी ज्वाला-गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना देखील महिला दुहेरीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.गुरुवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली चीनची ली जुईरुई हिला नमविणारी ११ वी मानांकित सिंधूला आज आठवी मानांकित कोरियाची सूंग जी हूएन हिने एक तास २२ मिनिटांत कडव्या संघर्षानंतर २१-१७, १९-२१, २१-१६ ने पाराभूत केले. २०१३ आणि २०१४ मध्ये सलग दोनदा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य विजेती सिंधूचा सूंगविरुद्धचा विक्रम ३-१ असा होता. या सामन्यात मात्र प्रतिस्पिर्धी खेळाडू सिंधूवर हावी झाली. सिंधूने सामन्यात ५४ पैकी तीन गेम गुण जिंकले. पहिला गेम १७-२१ ने गमविल्यानंतर सिंधूने मुसंडी मारली होती. त्याआधी भारताची १३ वी मानांकित दुहेरी जोडी ज्वाला-अश्विनी यांचा जपानच्या नाकोओ फुकमॅन आणि कुरुमी योनाओ या बिगर मानांकित जोडीने ४६ मिनिटात सलग गेममध्ये २५-२३, २१-१४ ने पराभूत केले. (वृत्तसंस्था)शुक्रवारी रंगलेल्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व सामन्यात दुसरी मानांकित सायनाने सहावी मानांकित २०११ ची सुवर्ण विजेती व जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू चीनची वांग यीहान हिच्यावर २१-१५, १९-२१, २१-१९ अशा फरकाने विजय साजरा केला. आॅलिम्पिक कांस्य विजेती सायनाने विश्व स्पर्धेत सहाव्या प्रयत्नात प्रथमच उपांत्य फेरीत धडक दिल्यामुळे एक पदकही निश्चित झाले आहे. सायनाला शनिवारी उपांत्य फेरीत बिगर मानांकित खेळाडू इंडोनेशियाची लिंडावेनी फानेत्री हिचे आव्हान राहील. सायनाचा लिंडावेनीविरुद्धचा विजयाचा रेकॉर्ड २-१ असा आहे. सायनाचे विश्व चॅम्पियनशिपमधील हे पहिले पदक असेल. सिंधूनंतर विश्व स्पर्धेत पदक एकेरीत पदक जिंकणारी सायना दुसरी महिला खेळाडू ठरेल.