शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सायना अजिंक्य

By admin | Updated: January 23, 2017 00:34 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत संघर्षपूर्ण विजय मिळवला आणि मलेशिया मास्टर्स

सरावाक : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत संघर्षपूर्ण विजय मिळवला आणि मलेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. दुखापतीतून सावरल्यानंतर सायनाचे हे पहिलेच जेतेपद आहे. सायनाने आज अंतिम फेरीत थायलंडच्या १८ वर्षीय पोर्नवावी चोचुवोंगची झुंज २२-२०, २२-२० ने मोडून काढली. लंडन आॅलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायनाने या लढतीत ४६ मिनिटांमध्ये विजय साकारला. सायनाचे कारकिर्दीतील २३ वे आणि गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपननंतरचे पहिले विजेतेपद आहे. गेल्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीने सतावल्यानंतर जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सायनासाठी हे जेतेपद मनोधैर्य उंचावण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सायना प्रथमच थायलंडच्या या खेळाडूविरुद्ध खेळली. थायलंडच्या खेळाडूने सुरुवातीलाच चार गुण वसूल करीत सायनाला बॅकफूटवर पाठविले. चोचुवोंगने वर्चस्व गाजवताना ब्रेकपर्यंत ११-५ अशी आघाडी घेतली. सायनाने त्यानंतर पुनरागमन करीत १०-१३ अशी पिछाडी भरून काढली आणि त्यानंतर १९-१९ अशी बरोबरी साधली. चोचुवोंग दडपणाखाली आल्याचा लाभ घेत अनुभवी सायनाने पहिला गेम जिंकत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही चोचुवोंगने चांगली सुरुवात करताना ३-० अशी आघाडी घेतली. पण सायनाने पुनरागमन करीत ७-५ अशी आघाडी घेत वर्चस्व निर्माण केले. थायलंडच्या खेळाडूने ८-८ आणि ११-११ अशी बरोबरी साधत तुल्यबळ लढत दिली. सायनाने थोडी आघाडी कायम राखली, पण त्यानंतर चार मॅचपॉर्इंट गमावले. त्यामुळे चोचुवोंग ही २०-२० अशी बरोबरी साधण्यात यशस्वी ठरली. सायनाने त्यानंतर सलग गुण वसूल करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)