शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

साई रे साई! श्रीकांतला नमवून सिंगापूर ओपनवर कब्जा

By admin | Updated: April 16, 2017 15:26 IST

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का देत बी.साईप्रणिथने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या

सिंगापूर , दि. 16 - अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का देत बी.साईप्रणिथने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला. किदम्बी श्रीकांत आणि बी साई प्रणिथ हे भारतीय बॅडमिंटनपटू आमनेसामने आल्याने खास ठरलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साईप्रणिथने श्रीकांतवर 17-21, 21-17, 21-12 अशी मात केली. साईप्रणिथचे हे पहिले सुपर सीरिज विजेतेपद आहे. 
 दोन्ही भारतीय खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केल्याने ही लढत अटीतटीची झाली. चुरशीच्या झालेल्या पहिल्या गेममध्ये किदम्बी श्रीकांतने  साईप्रणिथची झुंज 21-17 अशा फरकाने मोडून काढत सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही दोनी बॅडमिंटनपटूंमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. एकेक पॉईंट मिळण्यासाठी साईप्रणिथ आणि श्रीकांत एकमेकांची परीक्षा घेत होते. दरम्यान श्रीकांतने घेतलेली मोठी आघाडी मोडून काढत साईप्रणिथने सामन्यात पुनरागमन केले. अखेर  या गेममध्ये साईप्रणिथ वरचढ ठरला आणि त्याने श्रीकांतला 21-17 अशी मात दिली. 
त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये साईप्रणिथने श्रीकांतवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्याने  गेमच्या  पूर्वार्धातच श्रीकांवर 11-5 अशी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी 21-12 अशी वाढवत विजेतेपदावर कब्जा केला.