शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

महामुकाबल्यासाठी भारत-पाक संघाला सचिननं दिला सल्ला

By admin | Updated: June 18, 2017 17:14 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होत असलेल्या ओव्हल मैदानावरील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम आज जगभरातून प्रेक्षक श्वास रोखून पाहतील

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 18 - भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होत असलेल्या ओव्हल मैदानावरील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जगभरातून प्रेक्षक श्वास रोखून पाहतील. विशेष म्हणजे क्रिकेट चाहत्यांसह या सामन्यामुळे क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरच्या हृदयाचीही धडधड वाढली आहे. या सामन्यात भारत पाकिस्तानवर भारी पडेल, अशी शक्यता सचिन तेंडुलकरनं वर्तवली आहे. पाकिस्तानच्या विरोधात अनेक सामन्यांत भारताला विजय मिळवून दिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही या सामन्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, जगभरात ज्या पद्धतीनं लोकांना या सामन्याची उत्कंठा लागली आहे, त्याप्रमाणेच मीसुद्धा या सामन्याची वाट पाहतो आहे. पाकिस्तानविरोधातल्या महामुकाबल्यात भारताचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. माझी इच्छा आहे की, भारतानं चांगलं खेळावं. जेणेकरून सामन्यानंतर आपण सर्व मिळून जल्लोष करू. क्रिकेटच्या देवानं या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत विराट कोहलीनं कर्णधार म्हणून निभावलेल्या भूमिकेसह इतरही खेळाडूंच्या प्रदर्शनाची प्रशंसा केली आहे. (भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरीजबद्दल काय म्हणाले अमित शहा)(पाकिस्तान : बेभरवशाचा आणि धोकादायक! )सचिन म्हणाला, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत विराट कोहलीचं नेतृत्व जबरदस्त राहिलं आहे. विराटसह रोहित शर्मा आणि शिखर धवननंही चांगली फलंदाजी केली आहे. युवराज सिंगनेही शानदार खेळाचा नजराणा पेश केला होता. वेगवान गोलंदाजांनीही भेदक चेंडू टाकले होते. तर फिरकी गोलंदाजांनीही चांगलं प्रदर्शन केलं आहे. आता बस्स, आजही यांनी असंच प्रदर्शन करावं. आपण एक अभेद्य टीम आहोत. मास्टर ब्लास्टरच्या मते, भारतीय संघ या सामन्यात पूर्ण तयारीनिशी उतरला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारतानं चांगला खेळ केला आहे. पाकिस्तान संघाची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली नसल्यानं भारत नक्कीच वरचढ ठरेल, असंही भाकित सचिन तेंडुलकरनं केलं आहे.