शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

‘शाही’ परिवारासोबत सचिन खेळला क्रिकेट

By admin | Updated: April 11, 2016 02:04 IST

मुंबईच्या ओव्हल मैदानावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रविवारी ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स यांच्यासोबत क्रिकेट खेळले आणि त्याने आतापर्यंतची संभवता सर्वांत संथ गोलंदाजी केली.

मुंबई : मुंबईच्या ओव्हल मैदानावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रविवारी ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स यांच्यासोबत क्रिकेट खेळले आणि त्याने आतापर्यंतची संभवता सर्वांत संथ गोलंदाजी केली.विल्यम्सबरोबर त्याची पत्नी केट मिडलटनदेखील उपस्थित होती आणि या दोघांनी आज भारत दौऱ्याची सुरुवात केली. ताज हॉटेलमध्ये २६ नोव्हेंबरच्या पीडितांना श्रद्धांजली देणाऱ्या या दोघांचा हा पहिला मोठा सार्वजनिक कार्यक्रम होता.तेंडुलकरने पहिला चेंडू टाकल्यानंतर एका शालेय विद्यार्थिनीने ड्यूक आॅफ केम्ब्रिजला गोलंदाजी केली. प्रिन्स विल्यम्सने पहिला चेंडू खेळला; परंतु दुसऱ्या चेंडूवर तो झेल देऊन बसला. त्यानंतर केटने काही हळुवार चेंडू खेळले. प्रिन्सने चांगली फलंदाजी केली का, असे छेडल्यावर सचिन म्हणाला, ‘‘निश्चितच. त्याने चेंडूला बॅटच्या मधोमध खेळले.’’ यादरम्यान तेंडुलकरची पत्नी अंजलीदेखील ओव्हल मैदानावर उपस्थित होती. प्रिन्स विलियम आणि केटने यादरम्यान मुंबईच्या तीन एनजीओ मॅजिक बस, डोर स्टेप स्कूल आणि इंडियास चाइल्ड लाईनच्या प्रतिनिधी आणि मुलांशी चर्चा केली. या जोडीने एनजीओसाठी क्रिकेट बॅटवर स्वाक्षरी दिली आणि नंतर स्थानिक चॅरिटी अपनालयच्या मुलांसोबत मुंबई ओपन बस टूरचा आनंद लुटला. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या अकॅडमीतील मुलांशीही संवाद साधला. (वृत्तसंस्था)