शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

रोहन-जीवन ‘चेन्नई’त एक्स्प्रेस

By admin | Updated: January 9, 2017 04:12 IST

चेन्नई ओपनच्या एकेरी विभागात जरी भारताचे आव्हान लवकर संपुष्टात आले असले, तरी पुरुष दुहेरीमध्ये मात्र भारतीयांचेच वर्चस्व राहिले.

चेन्नई : चेन्नई ओपनच्या एकेरी विभागात जरी भारताचे आव्हान लवकर संपुष्टात आले असले, तरी पुरुष दुहेरीमध्ये मात्र भारतीयांचेच वर्चस्व राहिले. भारतीय खेळाडूंमध्येच झालेल्या अंतिम सामन्यात स्टार खेळाडू रोहन बोपन्नाने जीवन नेदुनचेझियानसह खेळताना दिविज शरण-पुरव राजा यांना नमवून जेतेपदाला गवसणी घातली.बोपन्ना - जीवन यांनी स्पर्धेत सातत्यपुर्ण कामगिरीसह चमकदार आगेकूच करणाऱ्या दिविज - राजा यांचा केवळ ६५ मिनिटांंमध्ये ६-३, ६-४ असा पराभव केला. विशेष म्हणजे बोपन्ना - जीवन यांनी मिळून जिंकलेले हे पहिले विजेतेपद ठरले. त्याचवेळी त्यांनी दिविज - राजा यांना तिसरे जेतेपदापासून दूर ठेवले. स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केलेल्या दिविज - राजा यांना अंतिम फेरीत आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयश आले. अंतिम सामन्यात वयाने सर्वात लहान असलेल्या जीवनने अनुभवी बोपन्नासह लक्षवेधी खेळ केला. या सामन्यात आपली सर्विस एकदाही न गमावणारा तो एकमेवळ खेळाडू राहिला हे विशेष. त्याने आपल्या वेगवान व अचूक सर्विसच्या जोरावर जेतेपद जिंकण्यात मोलाचे योगदान दिले. दुसरीकडे, दिविज - राजा यांच्याकडून सर्विस करताना अनेक चुका झाल्या. यामुळे त्यांनी अनेक गुण बोपन्ना - जीवन यांना अक्षरश: बहाल केले. याजोरावर बोपन्ना - जीवन यांनी वर्चस्व मिळवताना दिविज - राजा जोडीवर कमालीचे दडपण टाकून त्यांना आणखी चुका करण्यास भाग पाडले. (वृत्तसंस्था)

भारतीय टेनिससाठी हे खूप मोठे पाऊल ठरले. कदाचित एका तरी लहान मुलाला टेनिस रॅकेट हाती घेण्यास हे जेतेपद प्रेरीत करेल. हा विजय भारतीय टेनिससाठी मोठा विजय आहे. जीवनला अधिकाधिक सहजपणे खेळता येईल यावर माझा भर होता. त्याच्याहून अनुभवी असलेले दिविज व राजा यांच्यावरील दडपण दिसत होते. या सामन्यात दोन्ही संघांना संधी मिळाल्या, परंतु आम्ही त्या संधी साधण्यात यशस्वी ठरलो.- रोहन बोपन्ना बोपन्नाचे हे कारकिर्दीतील १५ वे जेतेपद असून जून २०१५ नंतरचे त्याचे हे पहिलेच विजेतेपद ठरले. याआधी बोपन्नाने फ्लोरिन मर्जियासह खेळताना स्टुटगार्ड ओपनचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर बोपन्नाला सिडनी आणि माद्रिद स्पर्धांमध्ये पराभवास सामोरे जावे लागले होते. एटीपी वर्ल्ड टूर स्तरावर जीवनचे हे पहिलेच विजेतेपद ठरले. चॅलेंजर सर्किटमध्ये जीवनने एकूण ३ दुहेरी विजेतेपद पटकावली आहेत.

२०११ साली लिएंडर पेस - महेश भूपती या स्टार जोडीने येथे बाजी मारल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय जोडीने दुहेरीचे विजेतेपद उंचावले आहे. पेस - भूपती यांनी चेन्नई ओपनमध्ये तब्बल पाच विजेतेपद जिंकली आहेत.