शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रॉजर फेडरर, वावरिंका जेतेपदासाठी भिडणार

By admin | Updated: March 20, 2017 00:10 IST

स्वित्झर्लंडचा लिजंड टेनिसपटू रॉजर फेडररने एटीपी इंडियन वेल्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना अमेरिकेच्या जॅक सॉकला सरळ

इंडियन वेल्स : स्वित्झर्लंडचा लिजंड टेनिसपटू रॉजर फेडररने एटीपी इंडियन वेल्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना अमेरिकेच्या जॅक सॉकला सरळ दोन सेटमध्ये नमवले. विशेष म्हणजे, याआधी झालेल्या उपांत्य सामन्यात प्रतिस्पर्धी आॅस्टे्रलियाच्या निक किर्गिओसने घेतलेल्या माघारीमुळे फेडररने सामना न खेळताच उपांत्य फेरी गाठली होती. त्याचवेळी, स्पर्धेच्या विजेतेपदासाठी फेडररला आपला देशबांधव स्टेन वावरिंकाविरुध्द दोन हात करावे लागतील.या स्पर्धेचे चार वेळा विजेतेपद पटकावलेल्या फेडररने दहाव्यांदा उपांत्य फेरी खेळली. त्याआधी त्याने उपांत्यपुर्व फेरीचा सामना न खेळताच आगेकूच केली होती. अन्नातून विषबाधा झाल्याने किर्गिओसने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने फेडररचा उपांत्य फेरी प्रवेश सुकर झाला. उपांत्य सामन्यात फेडररने आपला धडाका कायम राखताना जॅक सॉकचा ६-१, ७-६(४) असा पाडाव केला. पहिला सेट सहजपणे जिंकलेल्या फेडररला दुसऱ्या सेटमध्ये जॅकने चांगलेच झुंजवले. हा सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर मात्र, फेडररने आपला दर्जा दाखवताना जॅकला कोणतीही संधी न देता दिमाखत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे फेडररचा देशबांधव वावरिंकाने देखील सहजपणे अंतिम फेरीत प्रवेश करताना स्पेनच्या पाब्लो कॅरिनो बुस्ताचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला. वावरिंकाच्या आक्रमक धडाक्यापुढे पाब्लोचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही. तसेच, वावरिंकाने कारकिर्दीत पहिल्यांदाच या सामन्याच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी उपांत्यपुर्व फेरीत वावरिंकाने आॅस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमचा तीन सेटपर्यंतच्या अटीतटीच्या सामन्यात ६-४, ४-६, ७-६ असा पाडाव केला होता. (वृत्तसंस्था)