शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिस्पर्धी माझ्यावर जळतात : पेस

By admin | Updated: September 19, 2016 22:30 IST

माझे प्रतिस्पर्धी खेळाडू माझ्यावर जळतात, माझी प्रतिमा खराब करण्याचे एकमेव काम ते करीत आहेत, अशा शब्दात भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने जोरदार हल्ला चढविला आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ : माझे प्रतिस्पर्धी खेळाडू माझ्यावर जळतात, माझी प्रतिमा खराब करण्याचे एकमेव काम ते करीत आहेत, अशा शब्दात भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने जोरदार हल्ला चढविला आहे. पेसने टेनिस क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आहे, पण त्याबरोबरच वादविवादही त्याची पाठ सोडत नाहीत. आॅलिम्पिक असो, आशियाई स्पर्धा असो किंवा डेव्हीस कप असो, कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पेस खेळत असला तरी वादविवाद त्याच्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत असतो.

पेसने म्हंटले आहे की, लोक माझ्याविषयी काय बोलतात याचा त्याला काही फरक पडत नाही, तो इतिहास घडवण्यात व्यस्त आहे. डेव्हीस कपनंतर वृत्तसंस्थेशी त्याने काल रविवारी दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे की, कारकिर्दीच्या या वळणावर बहुतांश प्रतिस्पर्धी खेळाडू माझ्यावर जळत आहेत. १८ ग्रँडस्लॅम जिंकणे आणि सात आॅलिम्पिक स्पर्धा खेळण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात हे त्यांना माहित नाही.

काही खेळाडूंनी जरी दहावेळा जन्म घेतला तरी त्यांना हे शक्य नाही. या ठिकाणावर पोहचण्यासाठी कष्ट करण्याऐवजी ते मला येथून खाली खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. पडद्याआड चाली रचून माझ्या प्रतिमेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्य खर्च करावे लागते, आणि ती घालण्यासाठी एका सेकंदाचा वेळ पुरेसा असतो. जे माझ्याविषयी भुंकतात त्यांची मी काळजी करीत नाही. मी टेनिस कोर्टवर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत असतो. पेस म्हणतो...माझ्यावर टीका करुन काही लोकांना प्रसिध्दी मिळवायची आहे. जोपर्यत मी ग्रँडस्लॅम जिंकत आहे, तो पर्यंत खेळत राहणारलोकांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करुन मी माझी चाल चालणार आहे. लोक तुमच्या शांत स्वभावाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात