शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ऋषभ पंतचे विक्रमी वेगवान शतक

By admin | Updated: November 9, 2016 02:14 IST

झारखंडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात दिल्लीचा युवा फलंदाज ऋषभ पंत याने केवळ ४८ चेंंडंूत शतकी तडाखा देत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वांत जलद शतक ठोकण्याचा विक्रम

नवी दिल्ली : झारखंडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात दिल्लीचा युवा फलंदाज ऋषभ पंत याने केवळ ४८ चेंंडंूत शतकी तडाखा देत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वांत जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला. केरळमधील थुम्बा येथे सुरू असलेल्या या सामन्यात पंतने ६७ चेंडंूत ८ चौकार व १३ षटकारांची आतषबाजी करून १३५ धावांची तुफानी खेळी केली.पंतने यंदाच्या मोसमामध्ये धमाकेदार खेळ करताना आतापर्यंत ७ डावांत १३३.१६च्या जबरदस्त सरासरीने ७९९ धावा कुटल्या आहेत. यंदाच्या सत्रातील पंतने चौथे शतक ठोकले आहे. तसेच, आतापर्यंतच्या ५ सामन्यांत त्याने तब्बल ४४ षटकार टोलावले आहेत. या सत्रात त्याची कामगिरी १४६, ३०८, २४, ०९, ६०, ११७ आणि १३५ अशी शानदार झाली आहे. या विक्रमी खेळादरम्यान पंतने तमिळनाडूचे माजी फलंदाज व्ही. बी. चंद्रशेखर व आसामचे माजी फलंदाज राजेश बोरा यांचा २८ वर्षे जुना असलेला विक्रम मोडला. या दोघांनीही प्रत्येकी ५६ चेंडूंत वेगवान शतक झळकावले होते. बोरा यांनी १९८८ फेब्रुवारीमध्ये त्रिपुराविरुद्ध गुवाहाटीमध्ये रणजी स्पर्धेत, तर चंद्रशेखर यांनी त्याचवर्षी शेष भारताविरुद्ध ही खेळी केली होती.१९ वर्षीय पंतने पहिल्या डावातही शतक झळकावताना ८२ चेंडू खेळले होते. त्याने पहिल्या डावात १०६ चेंडंूत ११७ धावा काढल्या होत्या. यासह तो, दोन्ही डावात शतक झळकावणार सहावा दिल्लीकर ठरला. याआधी मन्सूर अली खान पतौडी, सुरिंदर खन्ना, मदनलाल, अजय शर्मा आणि रमन लांबा यांनी अशी कामगिरी केली होती.1982मध्ये झालेल्या शेफिल्ड शिल्ड सामन्यात त्यांनी दक्षिण आॅस्टे्रलियाकडून खेळताना व्हीक्टोरियाविरुद्ध अ‍ॅडेलेड ओव्हल येथे अवघ्या ३४ चेंडंूत शतकी तडाखा दिला होता.जागतिक स्तरावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद शतक झळकावण्याचा विक्रम आॅस्टे्रलियाच्या डेव्हिड हुक्सच्या नावावर आहे.