क्वालालम्पूर : जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील अव्वल खेळाडू मलेशियाचा ली चोंग वेई याच्यावर डोपिंग नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी विश्व बॅडिमंटन महासंघाने(बीडब्ल्यूएफ ) तात्पुरती बंदी घातली आहे.
बीडब्ल्यूएफने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तानुसार ऑगस्ट महिन्यात विश्व चॅम्पिनशिपदरम्यान वेईचे नमुने घेण्यात आले त्यात तो पॉङिाटिव्ह आढळताच विश्व संस्थेने ही तात्पुरती बंदी घातली. हे प्रकरण बीडब्ल्यूएफच्या सुनावणी पॅनलकडे पाठविण्यात येत आहे. पुढील कारवाईसाठी तारीख, वेळ आणि दिवस निश्चित केली जाईल. वेई याने डोपिंग केले अथवा नाही याचा निर्णय हे पॅनल घेणार आहे.
विश्व डोपिंग विरोधी एजन्सीच्या(वाडा) नियमानुसार एखाद्या खेळाडूवर पहिल्यांदा डोपिंगचा आरोप सिद्ध झाल्यास किमान दोन महिने बंदी घातली जाते. वेईवर सध्या अस्थायी बंदी घालण्यात आली. पण त्याच्यावर पुढील आरोप सिद्ध झाल्यास रियो ऑलिम्पिकपासून त्याला वंचित रहावे लागेल. वेई हा सुनावणी पॅनलसमोर दोषी आढळल्यास त्याला ऑगस्ट महिन्यात कोपेनहेगेन येथे मिळालेले रौप्य पदक परत करावे लागेल. याच स्पर्धेदरम्यान त्याचा नमुना घेण्यात आला होता. यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या आशियाडमध्ये त्याने वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत जिंकलेले कांस्य देखील गमवावे लागू शकते.
त्याआधी वेई याने डोपिंगमध्ये पॉङिाटिव्ह आढळल्यानंतरही आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. पण मलेशिया बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष मोहम्मद नोरजा जकारिया यांनी खेळाडूंचे नाव न सांगता 5 नोव्हेंबर रोजी डोप टेस्टमध्ये देशाचा एक दिग्गज खेळाडू अडकल्याचा खुलासा केला होता. दुस:या एका ज्येष्ठ अधिका:याने तो खेळाडू वेई असल्याचे म्हटले होते.
32 वर्षाच्या वेई ने टि¦टर व फेसबुकवर हे वृत्त निराधार असल्याचे सांगून चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभारही मानले होते. ‘ कठीण समयी माझी साथ दिल्याबद्दल आपला आभारी आहे. माङयावर लागलेले लांच्छन लवकरात लवकर पुसण्याचे मी तुम्हाला आश्वासन देतो,’ असे चाहत्यांना संबोधित करताना म्हटले होते.(वृत्तसंस्था)
गत आठवडय़ात वेईची ब नमुना चाचणी झाली. त्यात आणि अ चाचणीतही स्टेरॉईड आढळले होते. ऑगस्ट महिन्यात डेन्मार्क येथे झालेल्या स्पर्धेच्यावेळी पायावरील सूज कमी व्हावी यासाठी स्टेरॉईड घेतले होते. या स्पर्धेत तो तिस:यांना उपविजेता राहिला. 2क्क्8 चे बीजिंग आणि 2क्12 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणा:या वेई याने रियो ऑलिम्पिक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मी कधी कुणाची फसवणूक केली नाही किंवा कुठल्याही प्रतिबंधित द्रव्य सेवनावर माझा विश्वास नाही. पॉङिाटिव्ह आढळल्याचे वृत्त खोडसाळ आहे.
- ली चोंग वेई,
अव्वल बॅडमिंटनपटू