शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला दिलासा

By admin | Updated: March 5, 2016 02:57 IST

आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची केवळ औपचारिकता बनून राहिलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर सहा विकेटसनी विजय मिळवला.

मीरपूर : आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची केवळ औपचारिकता बनून राहिलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर सहा विकेटसनी विजय मिळवला. स्पर्धेतील कचखाउ कामगिरीमुळे चाहत्यांच्या रोषाला बळी पडलेल्या पाकिस्तानी संघाला या विजयामुळे थोडा दिलासा मिळाला असेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला १५0 धावांत रोखणाऱ्या पाकिस्तानने हे आव्हान १९.२ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार केले. उमर अकमला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.उभय संघ अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर गेले आहेत. रविवारी भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान जेतेपदासाठी अंतिम झुंज रंगणार आहे.आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची सुरवात डळमळीत झाली. सलामीवीर मोहम्मद हाफीज १४ धावांवर बाद झाला. पण यानंतर शेर्जील खान (३१) आणि सर्फराज अहमद (३८) यांनी लंकेच्या गोलंदाजांना दाद लागू दिली नाही. हे दोघे बाद झाल्यावर उमर अकमल आणि शोएब मलिक यांनी ३७ चेंडूत ५६ धावांची भागीदारी करुन विजय आवाक्यात आणला. उमरने ३७ चेंडूत ४८ धावा करताना ४ चौकार आणि २ षटकार मारले. धावसंख्येची बरोबरी करुन उमर तंबूत परतला. मलिकने विजयी धाव घेतली.तत्पूर्वी, तिलकरत्ने दिलशानची (नाबाद ७५) शानदार खेळी व त्याने कर्णधार दिनेश चांदीमलसोबत (५८) सलामीला केलेल्या ११० धावांच्या भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध शुक्रवारी ४ बाद १५० धावांची आव्हानात्मक मजल मारली होती. दिलशानने ५६ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ७५ धावा फटकावल्या. त्यात १० चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. चांदीमलने ४९ चेंडूंमध्ये ७ चौकार व १ षटकार ठोकला. या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी १४.१ षटकांत ११० धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली.