शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

रिलेत जमैकाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 02:37 IST

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या ४ बाय ४०० मीटर शर्यतीत बोलबाला राहिला तो बलाढ्य जमैकाचा. प्रथम महिला आणि नंतर पुरुष संघाने सुवर्ण पदक काबीज करून जमैकाने एकहाती

बीजिंग : जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या ४ बाय ४०० मीटर शर्यतीत बोलबाला राहिला तो बलाढ्य जमैकाचा. प्रथम महिला आणि नंतर पुरुष संघाने सुवर्ण पदक काबीज करून जमैकाने एकहाती दबदबा राखला. विशेष म्हणजे या सांघिक सुवर्णपदकासह जमैकाचा ‘वेगाचा बादशाह’ उसेन बोल्ट याने स्पर्धेत तीन, तर स्पर्धा इतिहासातील तब्बल ११ वे सुवर्ण पदक पटकावण्याचा पराक्रम केला. त्याचवेळी पुरुषांच्या ५ हजार मीटरच्या शर्यतीमध्ये ग्रेट ब्रिटनचा विक्रमवीर मोहम्मद फराह याने अपेक्षेनुसार सुवर्णपदकावर नाव कोरले. हे त्याचे ५ हजार मीटरमधील सलग तिसरे जागतिक विजेतेपद ठरले. पुरुषांच्या लढतीत जमैकाच्या बलाढ्य चौकडीने कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिका संघ बाद झाल्याचा फायदा घेत सहज बाजी मारली. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या उसेन बोल्टने अपेक्षित कामगिरी करताना विजयी कामगिरीचा धडाका कायम राखला. जमैकाने ३७.३६ अशी जबरदस्त वेळ देत जागतिक विक्रम रचला. विशेष म्हणजे या वेळी चीनने रौप्य व कॅनडाच्या चौकडीने कास्यपदकावर कब्जा केला. महिलांच्या रिले शर्यतीमध्ये वेरोनिका कॅम्बेल - ब्राऊन, नताशा मॉरिसन, एलेन थॉमसन आणि शेली-अ‍ॅन फ्रेझर - प्रीस यांच्या चमूने ४१.०७ सेकंदाची वेळ देत वर्चस्व राखले. सुरुवातीला पिछाडीवर राहिलेल्या जमैकाच्या धावपटूंनी नंतर आघाडी घेत बाजी मारली. अखेरच्या टप्प्यामध्ये शेली-अ‍ॅन हिने जबरदस्त वेगासह मोठी आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांना सहज मागे टाकले. अमेरिका आणि त्रिनिनाद - टोबॅगो या संघांनी अनुक्रमे ४१.६८ सेकंद व ४२.०३ सेकंद या वेळेसह रौप्य आणि कास्यपदक पटकावले.भारताच्या पदरी निराशाच...जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा अंतिम टप्प्यात असून अजूनही भारताची पदकांची झोळी रिकामी आहे. महिलांच्या ४ ७ ४०० रिले स्पर्धेत भारतीय संघ हिटमध्येच बाहेर पडला. तर पुरुषांच्या ५० मीटर चालण्याच्या स्पर्धेत देखील भारतीयांची कामगिरी निराशाजनकच राहिली. त्याचवेळी थाळीफेकीच्या अंतिम फेरीत भारताचे आशास्थान असलेला विकास गौडा नवव्या स्थानी राहिला.अंतिम फेरीत विकासची कामगिरी पात्रता फेरीपेक्षाही खालावली. पात्रता फेरीमध्ये त्याने ६३.८६ मीटरची फेक करुन अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत त्याची फेक ६२.२४ अशी मर्यादित राहिली. पहिल्या प्रयत्नात ६०.२८ मीटरची फेक केल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात ६२.२४ मीटरची फेक केली. पोलंडच्या पायोत्र मलाचोक्सी याने ६७.४० मीटरची जबरदस्त फेक करुन सुवर्ण निश्चित केले. पुरुषांच्या ५० किमी चालण्याच्या स्पर्धेत संदीप कुमार आनि मनीष सिंग रावत यांना अनुक्रमे २६ व २७व्या स्थानी समाधान मानावे लागले.