शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिज आव्हान पेलण्यास सज्ज

By admin | Updated: February 24, 2015 00:10 IST

गेल्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून त्यांना मंगळवारी ‘ब’ गटातील लढतीत झिम्बाब्वेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

कॅनबेरा : गेल्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून त्यांना मंगळवारी ‘ब’ गटातील लढतीत झिम्बाब्वेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सलामी लढतीत आयर्लंडविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने शनिवारी ख्राईस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत पाकिस्तानचा १५० धावांनी पराभव केला आणि या २०१५ च्या विश्वकप स्पर्धेत गुणाचे खाते उघडले. झिम्बाब्वेनेही यापूर्वीच्या लढतीत संयुक्त अरब अमिरातचा ४ गडी राखून पराभव करीत दोन गुणांची कमाई केली. वेस्ट इंडिजने आतापर्यंत झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या ४४ पैकी ३४ सामन्यांत विजय मिळविला आहे, पण आयर्लंडने विश्वकप स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवले जाणार असल्याची प्रचीती दिली आहे. आयर्लंड संघाविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या विंडीज संघावर टीकेची झोड उठली, पण अष्टपैलू आंद्रे रसेलच्या मते संघाला आता सूर गवसला आहे. पाकविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करीत सामनावीर ठरलेला रसेल म्हणाला, ‘‘आयर्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अशा प्रकारचा विजय सुखावह आहे. या विजयामुळे विंडीज संघ काय करू शकतो, याची प्रतिस्पर्ध्यांना कल्पना आलेली आहे. आमचा दिवस असेल तर आम्ही कुठल्याही प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकतो. संघाला सूर गवसला असून आम्ही कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहोत.’’विंडीज संघासाठी सलामीवीर ख्रिस गेलचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत तो केवळ ४ धावा काढून तंबूत परतला. गेल्या १९ डावांत त्याची सरासरी केवळ १४.४२ आहे. २० महिन्यांपूर्वी त्याने अखेरची शतकी खेळी केली होती. पाकविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झालेला अष्टपैलू ड्वेन ब्राव्होच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टन चिगुम्बुरा म्हणाला, ‘‘आम्ही विंडीज संघाला पराभूत करण्यास उत्सुक आहोत.’’ पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही झिम्बाब्वे संघाच्या कामागिरीची प्रशंसा झाली होती. दुसऱ्या लढतीत झिम्बाब्वेने संयुक्त अरब अमिरातीचा पराभव केला. त्या लढतीत नाबाद ७६ धावांची खेळी करणारा सीन विलियम्सने सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. विलियम्स म्हणाला, ‘‘प्रतिस्पर्धी संघाबाबत आदर आहे. विंडीज संघात सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या गेलचा समावेश आहे. आम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल.’’ (वृत्तसंस्था)