शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नेमबाज विश्वचषकात पदक जिंकण्यासाठी सज्ज

By admin | Updated: February 24, 2017 01:16 IST

फॉर्ममध्ये असलेले प्रतिभावान नेमबाज स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत येथील कर्णिसिंग शूटिंग रेंजमध्ये

नवी दिल्ली : फॉर्ममध्ये असलेले प्रतिभावान नेमबाज स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत येथील कर्णिसिंग शूटिंग रेंजमध्ये उद्या शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पदक जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत.अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघात तीन नवे चेहरे आहेत. बिंद्राने आॅलिम्पिकनंतर निवृत्ती जाहीर केली, तर गगन विश्वचषकाच्या केवळ रायफल प्रोन प्रकारातच पात्र ठरला आहे. पहिल्या दिवशी सत्येंद्रसिंग रवी कुमार आणि दीपक कुमार हे १० मीटर एअर रायफलमध्ये भारताचे आव्हान सादर करतील. महिलांच्या दहा मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात पूजा घाटकर, मेघना सज्जानर आणि विनिता भारद्वाज यांच्यासोबत आॅलिम्पिकचा अनुभव बाळगणारी अपूर्वी चंदेला हीदेखील रेंजमध्ये उतरणार आहे. महिला ट्रॅप प्रकारात राजेश्वरी कुमारी, सीमा तोमर आणि मनीषा खीर, तर शगुन चौधरी आणि श्रेयसी सिंग या किमान पात्रता गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. रिओ आॅलिम्पिकआधी भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली झाली; पण आॅलिम्पिकमधील अपयशानंतर भारतीय नेमबाजी संघटनेने अपयशाची चौकशी केली. ४ मार्चपर्यंत चालणाऱ्या विश्वचषकात ५० देशांचे ४५२ नेमबाज सहभागी होत आहेत. त्यात सध्याचे विश्वविजेते, आॅलिम्पिक चॅम्पियन आणि विविध उपखंडातील विजेत्यांचा समावेश आहे. नेमबाजीतील प्रसिद्ध चेहऱ्यांमध्ये डायना बाकोसी, गॅब्रियल रोसेटी, मेंगशुई झांग, किम्बर्ले ऱ्होड्स आणि नासिर अल अतैया यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)