शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅल इंग्लंड’ स्पर्धेसाठी सज्ज : सायना नेहवाल

By admin | Updated: March 5, 2017 23:53 IST

इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा सामना करण्यास आपण सज्ज असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : पुन्हा तंदुरुस्त झालेली आणि कडवे आव्हान पेलण्यासाठी कटिबद्ध असलेली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने पुढील आठवड्यात होणाऱ्या प्रतिष्ठित इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा सामना करण्यास आपण सज्ज असल्याचे सांगितले.दुखापतीतून सावरल्यानंतर सायनाचे लक्ष्य बॅडमिंटनमध्ये पुन्हा अव्वल स्थान मिळविणे हे असेल. सायना म्हणाली, ‘माझे लक्ष्य जगात सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडूंत समाविष्ट होणे हे आहे. तसेच सर्वोत्तम खेळाडूंच्या कडव्या आव्हानाचा सामना करण्यातच बॅडमिंटन खेळण्याचा खरा आनंद असतो. मी २0१५ वर्षी आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये उपविजेती होती; परंतु कारोलिना (मारीन) हिचा सामना करणे सर्वांत मोठे आव्हान होते. तिने माझ्यावर वर्चस्व मिळविले आणि विजेतेपद पटकाविण्यात ती यशस्वी ठरली.’गुडघेदुखीमुळे सायना रिओ आॅलिम्पिकच्या योजनेला धक्का बसला होता. त्यानंतर तिने पुन्हा पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी मानसिक मजबुती दाखविली आणि आॅगस्टमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तिने पुनरागमन केले. या २६ वर्षीय खेळाडूने गेल्यावर्षी चायना, हाँगकाँग आणि मकाऊ ओपनमध्ये सहभाग नोंदविला आणि यावर्षी जानेवारीत प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्येही सहभाग नोंदविला.सायना म्हणाली, ‘माझ्याकडे मलेशिया मास्टर्सआधी तयारीसाठी पुरेसा वेळ नव्हता; परंतु आता मी तंदुरुस्त आहे आणि दुखापत हे कारण नाही. कोणत्याही स्पर्धेच्या १५ दिवस आधी आपल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करणे खूप आवश्यक होते. मला मलेशिया ओपननंतर सरावास पुरेशी संधी मिळाली. मी खेळातील नव्या बाबी लक्षात ठेवून विमल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. >आता मी तंदुरुस्त आणि चांगल्या रीतीने सज्ज आहे आणि त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. - सायना नेहवाल