शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

विराट कोहलीच्या निर्णयावर रवी शास्त्री आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची टीका

By admin | Updated: June 11, 2017 15:17 IST

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या करो या मरो सामन्यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकला असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 11 - दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या करो या मरो सामन्यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकला असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉस झाल्यानंतर उमेश यादवच्या जागी फिरकीपटू अश्विनला संधी दिल्याचं कोहलीने स्पष्ट केलं, त्यानंतर भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी कोहलीच्या निर्णयावर टीका केली आहे. कोहलीच्या निर्णयावर माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.   
 
लंकेविरोधात अनपेक्षितपणे पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कोहलीने आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यासाठी उमेश यादवच्या जागी आर.अश्विनला संधी दिली आहे.  या निर्णयाबाबत बोलताना लक्ष्मण म्हणाला, यादवच्या जागी अश्विनला संधी देणं हे योग्य नाही त्यामुळे एका गोलंदाजाची कमी जाणवेल असं तो म्हणाला. तर यादवला बाहेर काढायचंच होतं तर त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळालयला हवी होती असं रवी शास्त्री म्हणाले. अश्विनला संधी द्यायचीच होती तर केदार जाधवच्या जागी संधी देता आली असती. तसंच टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. 
 
गत चॅम्पियन भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ अशा उपांत्यपूर्व सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान आहे. विराट कोहलीच्या वन डे नेतृत्वाचा या सामन्यात कस लागणार आहे.
 
लंकेकडून पराभव होताच भारतीय तंबूत निराशा पसरली. अशावेळी दडपणात गुडघे टेकणाऱ्या द. आफ्रिकेला कोंडीत पकडून पराभूत करण्याचे डावपेच कोहलीला आखावे लागणार आहेत. भारत पराभूत झाल्यास स्पर्धेबाहेर पडेल. द. आफ्रिका हरल्यास जगातील नंबर वन संघ उपांत्य सामन्यापासून वंचित राहील.
 
मैदानाबाहेर वादविवाद सुरू असताना मैदानावर आज कोहलीसाठी एकही चूक महागडी ठरू शकेल. दुसरीकडे कसोटीपासून दूर असलेल्या एबी डिव्हिलियर्सला वन डेत अद्याप दमदार कामगिरी कायम असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.द. आफ्रिकेकडे क्वींटन डिकॉक, जेपी ड्यूमिनी, डेव्हिड मिलर असे तीन डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय संघात अश्विनला स्थान मिळण्याची दट शक्यता असेल.
 
रवींद्र जडेजा मागच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरल्यामुळे त्याचे स्थान अश्विन घेऊ शकतो. अश्विन दोन सामने बाहेर राहिल्यानंतर कामगिरी करण्यास उत्सुक असेल. जडेजा ३० यार्डच्या आत तरबेज क्षेत्ररक्षक तर आहेच शिवाय सीमारेषेवरून अलगद थ्रो देखील करतो. प्रत्येक सामन्यात तो किमान १०-१५ धावा वाचवितो. हार्दिक पांड्याला देखील बाहेर केले जाणार नाही. सातव्या स्थानावर आक्रमक खेळणारा त्याच्यासारखा फलंदाज नाही. जसप्रीत बुमराह डेथ डोव्हरमध्ये चांगले यॉर्कर टाकतो. याचा अर्थ असा की अश्विनला उमेश यादव किंवा भुवनेश्वरऐवजी स्थान द्यावे लागेल. लंकेविरुद्ध दुसऱ्या पॉवरप्लेदरम्यान भारताने २०० वर धावा मोजल्या. त्यामुळे देखील धावगतीला लगाम लावण्यासाठी अश्विनला खेळविणे क्रमप्राप्त झाले आहे. भारताच्या आघाडीच्या फळीने चांगली फलंदाजी केली. रोहित शर्मा, शिखर धवन ही जोडी फॉर्ममध्ये आहे.