शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

रश्मीचा उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश

By admin | Updated: January 29, 2016 03:26 IST

महाराष्ट्राच्या रश्मी तेलतुम्बडे हिने एआयटीए मानांकन राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत धक्कादायक निकाल नोंदवताना तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकीत साई समिथा सी हिला

मुंबई : महाराष्ट्राच्या रश्मी तेलतुम्बडे हिने एआयटीए मानांकन राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत धक्कादायक निकाल नोंदवताना तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकीत साई समिथा सी हिला पराभूत केले. यासह रश्मीने दिमाखात उपांत्य फेरी गाठली आहे. जुहू येथील जेव्हीपीजी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या महिला गटातील उपांत्यपुर्व फेरीचा सामना चांगलाच गाजला. सातव्या मानांकीत रश्मीने पहिल्याच सेटमध्ये ६-३ अशी बाजी मारताना आश्चर्यकारक आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र साई समिथाने तुफान आक्रमक खेळ करताना ६-१ अशा दणदणीत विजयासह सामन्यात बरोबरी साधली. यावेळी साई समिथा बाजी मारणार अशी शक्यता होती. मात्र रश्मीने तोडिस तोड खेळ करताना अखेरचा सेट टायब्रेकमध्ये जिंंकताना साई समिथाचा ६-३, १-६, ७-६(९) असा झुंजार पराभव केला. अन्य एका लढतीत गोव्याच्या अग्रमानांकीत नताशा पल्हा हिने अपेक्षेनुसार उपांत्य फेरी गाठताना तामिळनाडूच्या बाबुराज नित्यराजचा ६-३, ६-३ असा धुव्वा उडवला. कर्नाटकच्या द्वितीय मानांकीत शर्मदा बालू हिनेही सहज उपांत्य फेरीत प्रवेश करताना दिल्लीच्या श्वेता राणाचा ६-२, ६-१ असा फडशा पाडला. तर पुण्याच्या नंदीनी शर्माने देखील झुंजार खेळासह उपांत्य फेरी गाठताना चौथ्या मानांकीत अमृता मुखर्जीला (पश्चिम बंगाल) ४-६, ६-४, ६-२ असा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधले. (क्रीडा प्रतिनिधी)