शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

रणजीत जम्मू काश्मीरची मुंबईवर मात

By admin | Updated: December 10, 2014 17:04 IST

रणजी क्रिकेटमध्ये लिंबू टिंबू समजल्या जाणा-या जम्मू काश्मीरच्या संघाने मुंबईसारख्या दादा संघाचा पराभव करत आपणही क्रिकेटमधील पक्के खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १० - रणजी क्रिकेटमध्ये लिंबू टिंबू समजल्या जाणा-या जम्मू काश्मीरच्या संघाने मुंबईसारख्या 'दादा' संघाचा पराभव करत आपणही क्रिकेटमधील 'पक्के' खेळाडू असल्याचे दाखवून दिले. बुधवारी वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात जम्मू काश्मीरने मुंबईचा चार विकेटने पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. 
 
रणजी ट्रॉफीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर हे संघ आमनेसामने होते. दुस-या डावात मुंबईने दिलेल्या २३७ धावांचे माफक आव्हान जम्मू काश्मीरने सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. पहिल्या डावात शतक ठोकणा-या शुभम खजूरियाने दुस-या डावातही ७८ धावांची अर्धशतकी खेळी करुन जम्मू काश्मीरला विजयाच्या दिशेने नेले.  जम्मू काश्मीरचा कर्णधार परवेझ रसूल (३२ धावा) आणि हरदीप सिंह (नाबाद ४४ धावा) यांनी तळाच्या फलंदाजांच्या साथीने जम्मू काश्मीरला विजय मिळवून दिला. जम्मू काश्मीरसारख्या संघाकडून घरच्या मैदानावरच पराभूत होण्याची नामुष्की मुंबई संघावर ओढावली आहे. ' मुंबईवर मात करणे आमच्यासाठी मोठी बाब असून गेल्या २ - ३ वर्षांमध्ये आमच्या कामगिरीचा आलेख उंचावला आहे. राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज संघाशी खेळणे वेगळे असते असे काही जण आम्हाला नेहमी सांगायचे. आता आमच्याकडे याचेही उत्तर आहे' अशी प्रतिक्रिया विजयी संघाचा कर्णधार परवेझ रसूलने सांगितले. 
 
धावफलक 
मुंबई - पहिला डाव  सर्वबाद २३६धावा, दुसरा डाव सर्वबाद २५३
 
जम्मू काश्मीर - पहिला डाव सर्वबाद २५४, दुसरा डाव ६ बाद २३७