राही, आरोही, मृण्मयी, शुभम्, धैर्यशील प्रथम
By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST
औरंगाबाद : एमएसएम येथे सुरू असलेल्या शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत राहिल भांड, आरोही भांड, मृण्मयी कुलकर्णी, शुभम् सरकटे, धैर्यशील देशमुख आदींनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला.
राही, आरोही, मृण्मयी, शुभम्, धैर्यशील प्रथम
औरंगाबाद : एमएसएम येथे सुरू असलेल्या शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत राहिल भांड, आरोही भांड, मृण्मयी कुलकर्णी, शुभम् सरकटे, धैर्यशील देशमुख आदींनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला.निकाल : रिदमिक (१४ वर्षांखालील) मुली : १. राही भांड (पोद्दार आयसीएसई), २. आर्या पाथरे (पोद्दार बीएसई), ३. पायल जाधव (स्वामी विवेकानंद अकॅडमी). १७ वर्षांखालील मुली : १. आरोही भांड (पोद्दार आयसीएसई), २. स्वर्णिमा धोटे (पोद्दार सीबीएसई), ३. अमृता पाठक (पोद्दार सीबीएसई), १९ वर्षांखालील : १. मृण्मयी कुलकर्णी (स्वामी विवेकानंद अकॅडमी), २. निधी धर्माधिकारी (ज्ञानदा इंग्लिश स्कूल), ३. अदिती वाडेकर (सेंट लॉरेन्स हायस्कूल).ॲक्रोबेटिक्समध्ये पुरुष दुहेरीत बालज्ञानमंदिरच्या शेखर माने व सिद्धांत सोनटक्के यांनी, तर मिश्र दुहेरीत द जैन इंटरनॅशनलच्या मानसी पवार व सिद्धेश जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. वुमेन्स ग्रुपमध्ये आकांक्षा चंदेले (शारदा मंदिर), अदिती वाडेकर (सेंट लॉरेन्स), दिशा चंदेले (विवेकानंद महा.) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मेन्स ग्रुपमध्ये शुभम् सरकटे (वंडर गार्टन प्राथमिक शाळा), मंगेश भांगे (महात्मा फुले हायस्कूल), सिद्धांत सोनटक्के (शासकीय महा.), कुमार नंदकिशोर जाधव (एसएफएस) यांनी अव्वल स्थान मिळवले.मनपा हद्दीबाहेरील निकाल (१७ वर्षांखालील मुले) : १. धैर्यशील देशमुख (महाराष्ट्र पब्लिक स्कूल), २. मानस साळुंके (स्टेपिंग स्टोन), ३. तेजस वाकळे (भास्कराचार्य इंग्लिश स्कूल). (क्रीडा प्रतिनिधी)