गॅले : श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेली पहिली कसोटी भारताच्या अजिंक्य रहाणेमुळे चांगलीच गाजली़ ती त्याच्या फलंदाजीमुळे नाही तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे. रहाणेने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून तब्बल ८ झेल घेताना जागतिक विक्रम नोंदवला. यापूर्वी एका कसोटी सामन्यात सर्वाधिक ७ झेल घेण्याचा विक्रम संयुक्तपणे ग्रेग चॅपल (आॅस्टे्रलिया), यजुर्विंद्र सिंग (भारत), हसन तिलकरत्ने (श्रीलंका), स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) आणि मॅथ्यू हेडन (आॅस्टे्रलिया) यांच्या नावांवर होता.
रहाणेने मोडला ‘अजिंक्य’ विक्रम
By admin | Updated: August 15, 2015 02:24 IST