न्यूयॉर्क - जागतिक क्रमवारीत दुस:या स्थानावर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे यू एस ओपनमधून माघार घेतली आहे.
त्याने फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली. नदालला गत महिन्यात सरावादरम्यान दुखापत झाली होती आणि तो त्यातून अद्याप पूर्णपणो बरा झालेला नाही. या दुखापतीमुळेच त्याने रॉजर्स कप आणि सिनसिनाटी ओपनमधून माघार घेतली होती. तो म्हणाला, यू एस ओपनमधून मी माघार घेत असल्याचे सांगताना मला दु:ख होत आहे. आशा करतो की तुम्ही मला समजून घ्याल.