शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

‘राफा’ची दणक्यात सुरुवात!

By admin | Updated: May 27, 2015 01:16 IST

माजी विजेत्या स्पेनच्या राफेल नदालने (राफा) यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतही दणक्यात सुरुवात केली आहे.

पॅरिस: माजी विजेत्या स्पेनच्या राफेल नदालने (राफा) यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतही दणक्यात सुरुवात केली आहे. त्याने फ्रान्सच्या क्विटेन हेल्सचा ६-३, ६-३, ६-४ ने सहज पराभव केला. दुसरीकडे नोवाक जोकोवीचने जे. नैनमीनीजचा ६-२, ७-५, ६-२ असा पराभव केला. भारताचा महेश भूपती व आॅस्ट्रेलियाचा त्याचा जोडीदार नीक किरगियोस यांना लुकास पोइले व तनाशी कोकिनाकिस यांच्याकडून ३-६, १-६ असा पराभव पत्कारावा लागला. महिलांच्या एकेरीत सेरेना विल्यम्सने ए हलवॅक कोव्हाला ६-२, ६-३ असे नमविले.जगप्रसिद्ध रोलॅँड गॅरोस स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत राफेल नदालचे वर्चस्व राहिले आहे. त्याने आज या मैदानावरील कारकिर्दीतील ६७वा विजय साजरा केला. त्याने हा सामना एक तास आणि ४९ मिनिटांत जिंकला. जगात २९६व्या क्रमांकावर असलेल्या क्विटेनविरुद्ध राफेल नदालला विजयासाठी विशेष संघर्ष करावा लागला नाही. त्याने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. १९ वर्षीय क्विटेनविरुद्ध पहिल्या सेटमध्ये नदालने ६-३ ने आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र क्विटेनचा खेळावरचा ताबाच सुटला. त्याने दुसऱ्या सेटमध्ये जवळपास ५२ चुका केल्या. याचा फायदा उठवत नदालने दुसऱ्या सेटमध्ये ४-२ आघाडी मिळवली होती. हा सेटही त्याने ६-३ अशा फरकाने जिंकला. निर्णायक सेटमध्ये क्विटेनने सर्व शक्ती पणाला लावली; मात्र नदालपुढे तो अपयशी ठरलादरम्यान, नदालला उपांत्यपूर्व फेरीत जगातील अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकाविचविरुद्ध खेळावे लागेल. तसेच त्याला अंतिम ३२ खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी स्पेनच्याच निकोलस अल्माग्रो आणि उक्रेनच्या अ‍ॅलेक्झांड्रो यांच्यातील विजेत्याविरुद्ध मैदानात उतरावे लागेल. रोहन बोपन्ना व फ्लोरियन मर्जिया यांची बुधवारी लढत होईल.(वृत्तसंस्था)कॅरोलिनचाही शानदार विजयमहिला गटात, डेन्मार्कची पाचवी मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीने शानदार विजय नोंदवला. तिने इटलीच्या कॅरीन क्नाफचा ६-३, ६-० ने पराभव केला. डेन्मार्कची ही माजी अव्वल मानांकित खेळाडू रोलॅँड गॅरोस मैदानावर उपांत्यपूर्व फेरीपर्यंतही पोहोचू शकलेली नाही. आता ती अंतिम सहा सामन्यांसाठी प्रयत्न करेल. दुसरीकडे, २७ वर्षीय इटलीची क्नाफ ही वर्षातील दुसरे ग्रॅण्डस्लॅम खेळत आहे. गेल्या आठवड्यात तिने नुरेमबर्ग येथील विजेतेपद पटकाविले होते. विजेत्या कॅरोलिनचा सामना आता जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जविरुद्ध होणार आहे. ज्युलियाने अमेरिकेच्या कोको वॅँडवेघेचा ६-२, ५-७ आणि ६-१ ने पराभव केला होता. पेट्राचा संघर्षफेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत चौथी मानांकित पेट्रा क्विटोव्हाला संघर्ष करावा लागला. विम्बल्डनची चॅम्पियन असलेल्या या खेळाडूला न्यूझीलंडच्या ८०व्या मानांकित मरिना इराक्विकने चांगलेच झुंजवले. अखेर अडीच तासांच्या संघर्षानंतर पेट्रा हिने बाजी मारली. तिने हा सामना ६-४, ३-६, ६-४ ने जिंकला. क्विटोही २०१२ मध्ये पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी खेळाडू आहे. त्यानंतर तिने नुकतेच माद्रिद येथे क्ले कोर्टवरील विजेतेपद पटकाविले आहे.