शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाकसोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच उदभवत नाही : ठाकूर

By admin | Updated: September 24, 2016 05:22 IST

पाकिस्तानसोबत भविष्यात द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुरळीत होण्याची शक्यता फेटाळून लावताना बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत विचार करणेही योग्य नसल्याचे म्हटले आहे.

कोझिकोड : पाकिस्तानसोबत भविष्यात द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुरळीत होण्याची शक्यता फेटाळून लावताना बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत विचार करणेही योग्य नसल्याचे म्हटले आहे. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीसाठी येथे आलेले ठाकूर म्हणाले,‘भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानला नेस्तनाबूत करू शकतो, पण त्यांना जागतिक पातळीवर एकाकी पाडणे महत्त्वाचे आहे.’ ठाकूर यांना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या योजनेबाबत विचारले असता त्यांनी उरी दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना म्हटले की,‘जे काही घडले ते बघता याबाबत विचारही करणे योग्य नाही. पाकिस्तानसोबत यंदाच्या मोसमात मालिकेचा कुठलाही कार्यक्रम नाही.’उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमधील तणाव वाढला आहे. शेजारी देशाला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी होत आहे. भारताने पाकिस्तानला १९६५, १९७१ आणि कारगिल युद्धांमध्ये पराभूत केले होते. भारताने विश्व क्रिकेट स्पर्धेतील सर्वंच लढतींमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे, असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडणे महत्त्वाचे ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)