शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

हैदराबादीला पंजाबी तडका

By admin | Updated: May 15, 2014 04:17 IST

किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायजर्स हैदराबाद संघाचे २0५ धावांचे आव्हान लीलया पेलत ६ विकेटस आणि ८ चेंडू राखून विजय मिळविला.

विश्वास चरणकर, हैदराबाद - किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायजर्स हैदराबाद संघाचे २0५ धावांचे आव्हान लीलया पेलत ६ विकेटस आणि ८ चेंडू राखून विजय मिळविला. या विजयाचे शिल्पकार ठरले ते मनन व्होरा आणि वृध्दीमान साहा हे युवा खेळाडू. मनन (२0 चेंडूत ४७ धावा, पाच चौकार २ षटकार) आणि वृध्दीमान साहा २६ चेंडुत ५४ धावा, ८ चौकार, २ षटकार) यांनी दुसर्‍या विकेटसाठी ४0 चेंडूत ९१ धावांची भागीदारी केल्यामुळे पंजाबचा विजय सुकर झाला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने नमन ओझाच्या ७९ धावांच्या जोरावर ५ बाद २0५ धावा केल्या. पण पंजाबने हे आव्हान नवख्या फलंदाजांच्या जोरावर पूर्ण केले. यंदाच्या सत्रासाठी पंजाबने मनन व्होरा हा एकमेव भारतीय खेळाडू रिटेन केला होता, परंतु त्याला अद्याप खेळायची संधी मिळाली नव्हती. आज त्याला पहिली संधी मिळाली आणि त्याने तिचे सोने केले. पंजाबच्या वृध्दीमान साहाला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. दोनशेच्यावर धावांचे आव्हान घेवून पंजाबच्या डावाची सुरवात चौकाराने करणार्‍या विरेंद्र सेहवागला दुसर्‍याच चेंडूवर भुवनेश्वरकुमारने तंबूचा रस्ता दाखविला. भुवीने सेहवागचा परतीचा झेल घेतला. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून मनन व्होराला प्रथमच संधी देण्यात आली होती, ती त्याने गमावली नाही, पंजाबकडून वृध्दीमान साहाला तिसर्‍या क्रमांकावर बढती दिली गेली. वृध्दीमान आणि मनन यांनी २१ चेंडूत पन्नास धावांची झटपट भागीदारी करुन डावाची चांगली पायाभरणी केली. ही जोडी कर्ण शर्माने फोडली. मनन व्होरा ४७ धावांवर यष्टीचित झाला. मननच्या जागी आलेल्या मॅक्सवेलचे स्वागत टाळ्यांच्या गजरात झाले, त्यानेही तीन षटकार ठोकून या टाळ्यांची परतफेड केली. दरम्यान, साहाने २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. इतर गोलंदाज पंजाबच्या धावगतीला वेसन घालण्यात अपयशी ठरल्यामुळे हैदराबादचा कर्णधार शिखर धवनने आपला हुकमी एक्का भुवनेश्वरकुमारला गोलंदाजीसाठी आणले. भुवीच्या या षटकांत साहा धावचित झाला. त्याने २६ चेंडूत ५४ धावा केल्या. यानंतर मिलर, मॅक्सवेल ही सुपरहिट जोडी मैदानात जमली. अकराव्या षटकांत अमित मिश्राच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलचा डेल स्टेनने एक उत्कृष्ट झेल घेतला, पण हा नोबॉल ठरला. त्यावेळी मॅक्सवेल २३ धावांवर होता. पुढच्या षटकांत मॅक्सवेलने कर्ण शर्माला दोन षटकार ठोकले. मॅक्सवेलला बाद करण्याचे भाग्य अमित मिश्राच्या आणि डेल स्टेनच्या नशिबी होते. चौदाव्या षटकातील मिश्राचा पहिला चेंडू मॅक्सवेलने लाँगआॅनच्या दिशेने मारला, पण तो गेला सरळ स्टेनच्या हातात. यावेळी सुदैवाने नोबॉल नव्हता. मॅक्सवेलने २२ चेंडूत ४३ धावा करताना ५ षटकार आणि २ चौकार ठोकले. मॅक्सवेल बाद झाला तेव्हा पंजाबला ४१ चेंडूत ४७ धावांची आवश्यकता होती. मिलर आणि कर्णधार जोडीने सावध फलंदाजी केल्याने १७ व्या षटकाअखेर हे अंतर १८ चेंडूत २८ धावा असे वाढले. अठराव्या षटकांत जॉर्ज बेलीने स्टेनला दोन चौकार आणि दोन षटकार ठोकून २२ धावा वसूल केल्याने सामना पंजाबच्या आवाक्यात आला. बेलीने भुवनेश्वरकुमारला लाँगआॅफला षटकार ठोकून पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मिलर २४ तर बेली ३५ धावांवर नाबाद राहिले. तत्पूर्वी, अ‍ॅरोन फिंचने हैदराबाद सनरायजर्सच्या डावाची सुरवात संदिपसिंगला खणखणीत चौकार ठोकून केली. पण धवन अडखळत होता. डावाच्या पाचव्या षटकांत संदीपसिंगच्या पहिल्याच चेंडूवर अ‍ॅरोन फिंचचा एक फटका ग्लेग मॅक्सवेलने मागे जात उत्कृष्टपणे झेलला. पण संदिपचा हा नोबाल ठरला. संदिपचे दुर्दैव इतक्यावरच थांबले नाही, त्याच्या पुढचा बॉलवर धववने चौकार ठोकला. हाही नोबॉलच होता. पुढच्या फ्रीहिटच्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही, पण शिखरने पुढच्या ४ चेंडूवर चौकार, षटकार, चौकार आणि पुन्हा चौकार ठोकल्याने स्टेडीयममध्ये जल्लोष उसळला. या षटकांत २६ धावा निघाल्या. सनरायजर्स हैदराबादची सलामीची जोडी नवव्या षटकांत शिवम शर्माने फोडली. त्याने फिंचचा त्रिफळा उडविला. फिंचने २0 धावा केल्या. संदिपसिंगच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे धवन चांगलाच रंगात आला होता. त्याने यंदाच्या आयपीएलमधील ३३ ही आपली सर्वोच्च धावसंख्या मागे टाकली. त्याची अर्धशतकाकडे असणारी वाटचाल रिषी धवनने थांबविली. स्क्वेअरलेगवरील शिवम शर्माने त्याचा झेल घेतला. शिखरने ३७ चेंडूत ४५ धावा केल्या. यानंतर नमन ओझा आणि डेव्हीड वॉर्नर यांची जोडी जमली. दोघांनी हैदराबादची धावगती कमी होणार नाही याची काळजी घेत फलंदाजी केली. दोघांनी १३ व्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले. वॉर्नर आणि ओझा हे अर्धशतकाजवळ पोहचले असता ही जोडी फुटली. चोरटी धाव घेताना वॉर्नर धावचित झाला. त्याने २३ चेंडूत ४५ धावा केल्या. नमन ओझाने मात्र आज एका बाजूने चांगली फलंदाजी केली. त्याने २९ चेंडूत अर्धशतक झळकावताना ३ चौकार आणि ४ षटकार ठोकले. वॉर्नर बाद झाल्यावर हेन्रिक्स मोईझेस आणि इरफान पठाण हे लवकर बाद झाले. पण नमन ओझाने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केल्यामुळे सनरायजर्स हैदराबादला २0५ धावांचा टप्पा गाठता आला. पंजाबकडून शिवम शर्माने ३१ धावात १ बळी घेतला, तर संदिपसिंग हा पंजाबचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ६५ धावा दिल्या.