शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचे बल्ले बल्ले!

By admin | Updated: May 14, 2015 01:15 IST

पावसाने दिलेल्या ‘ब्रेक’मुळे जवळपास अडीच तास उशिराने सुरू झालेल्या सामन्यात प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने बाजी मारली

मोहाली : पावसाने दिलेल्या ‘ब्रेक’मुळे जवळपास अडीच तास उशिराने सुरू झालेल्या सामन्यात प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने बाजी मारली. त्यांनी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २२ धावांनी पराभव केला. पंजाब संघ याआधीच प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी त्यांना हा विजय दिलासा देणारा ठरला. पंजाबने निर्धारित १० षटकांत ६ बाद १०६ धावा उभारल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने ६ बाद ८४ धावसंख्येपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात, बंगळुरूनेही धडाक्यात सुरुवात केली होती. विराट-गेल जोडीने २.१ षटकांत ३३ धावा केल्या. कोहली अनुरितच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने ९ चेंडूंत १९ धावा केल्या. यामध्ये २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. गेलने १७, डिव्हिलियर्सने १० आणि मनदीपसिंगने सर्वाधिक २० धावांचे योगदान दिले. मनदीप बाद झाल्यानंतर बंगळुरूचे फलंदाज झटपट बाद होत गेले. अखेर त्यांना निर्धारित षटकांत ६ बाद ८४ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. पंजाबकडून अनुरितसिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन, तर संदीप शर्मा आणि हेन्ड्रीक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दहा षटकांच्या या सामन्यात पंजाबकडून वृद्धिमान साहा आणि मनन वोहरा यांनी सुरुवात केली. साहाने १२ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. त्याने ५ चौकार आणि एक षटकार ठोकला. सामन्याच्या दुसऱ्या षटकांत अरविंदच्या गोलंदाजीवर साहाने १८ धावा फटकावल्या. यामध्ये ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. डेव्हिड वीजच्या चेंडूंवर तो मनदीपकरवी झेलबाद झाला. त्यानंतर मॅक्सवेल (१०), डेव्हिड मिलर (१४), बेली (१३) यांनी बहुमूल्य योगदान दिले. अक्षर पटेलने १५ चेंडूंत नाबाद २० धावा केल्या. नवव्या षटकात अक्षरने चहलच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. मात्र, चहलने बेलीला बाद करून मोठा अडथळा दूर केला. अंतिम षटकात स्टार्कने दिनेश कार्तिककरवी गुरकिरतला (२) बाद केले. बंगळुरूकडून हर्षल पटेल आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २, तर स्टार्क आणि वीज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)