शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचा पराभव करत पुण्याचा प्ले ऑफमध्ये प्रवेश

By admin | Updated: May 14, 2017 20:09 IST

रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं घरच्या मैदानावरच किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला आहे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 14 - रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं घरच्या मैदानावरच किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव करत बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे. पंजाबनं दिलेल्या 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुण्यानं 1 गड्याच्या मोबदल्यात 12 षटकांत 78 धावा काढून सामन्यावर कब्जा मिळवला आहे. राहुल त्रिपाठीने दमदार फलंदाजीच्या जोरावर 20 चेंडूंत 4 चौकार आणि एक षटकार लगावत 28 धावा केल्या आहे. तर अखेरपर्यंत नाबाद राहत रहाणे आणि स्मिथनं नाबाद 37 धावांची भागीदारी केली. अजिंक्य रहाणेने 1 षटकार आणि 1 चौकारासह खेचत 34 धावांची खेळी केली. तर कर्णधार स्टिव्हन स्मिथ 15 धावांवर नाबाद राहिला. 12व्या षटकांतच पुणे संघाने विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. जयदेव उनाडकत याला मॅन ऑफ द मॅचचा किताब बहाल करण्यात आला आहे. या विजयामुळे पुणे संघाचा बाद फेरीत प्रवेश झाला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पुण्यानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भेदक गोलंदाज जयदेव उनाडकतने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मार्टिन गुप्टिलला बाद करून पंजाबला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर मैदानावर आलेल्या शॉन मार्श, वृद्धिमान साहा, इऑन मॉर्गन, राहुल तेवटिया आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेल यांनी नुसतीच हजेरी लावण्याचे काम केले. पंजाबकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 22 धावा केल्या. स्वप्नील शहा (10) आणि साहा (13) यांनीही पंजाबच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. पंजाबचा डाव अवघ्या 73 धावांत आटोपला होता. पुण्याच्या शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 बळी घेऊन पंजाबला पराभवाची धूळ चारली आहे.