पुणो : घरात, मैदानावर खेळण्याच्या किंवा फार तर कॉम्प्युटरवर बसल्या जागी गेमचा आनंद लुटणा:या वयात पुण्याच्या युवराजसिंग कोंडेदेशमुख याने युवकांनाही शक्य होणार नाही, असा ऐतिहासिक पराक्रम केलाय. या अवघ्या 9 वर्षाच्या चिमुरडय़ाने अमेरिकेतील एएमए मोटोक्रॉस शर्यतीत 7 ते 11 वर्षे वयोगटात दुसरे स्थान पटकावले. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय आहे!
व्हजिर्निया प्रांतात असलेल्या अॅक्सटॉनमधील लेक शुगर ट्री मोटरस्पोर्ट्स पार्कमध्ये ही शर्यत नुकतीच झाली. वयोगट कमी असला तरी यातील सहभागी खेळाडूंना नैसर्गिक तसेच मानवनिर्मित उंच-सखल ट्रॅकवरच आपले कौशल्य दाखवावे लागते. पुण्यातील अजमेरा आयलँड रेसिंग अकादमीत सराव करणा:या युवराजने हे आव्व्हान सहजपणो पेलले. अमेरिकेसारख्या भारतापेक्षा प्रतिकूल वातावरण असलेल्या देशात प्रथमच जाऊन त्याने 3.2 किलोमीटरची ही शर्यत प्रभावी कामगिरीसह पूर्ण केली. इतक्या मोठय़ा अंतराच्या स्पर्धेत तो प्रथमच सहभागी झाला होता.
युवराज हा 8 वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारे रुस्तम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर रेसिंगचे धडे गिरवत आहे. सहाजिकच रुस्तम यांना आपल्या सहाजिकच आपल्या शिष्याचा अभिमान वाटतो. मात्र, या यशाचे श्रेय ते अजमेरा आयलँड स्पोर्ट्स अकादमीचे संचालक अतुल अजमेरा यांना देतात. ‘अजमेरा यांनी युवराजच्या मनात या अवघड खेळातील यशाबाबत आत्मविश्वास निर्माण केला. अशा खेळात आपल्या मुलाला सहभागी होण्याची परवानगी देणारे युवराजचे वडील संदीप कोंडेदशमुख यांचेही कौतुक करावे, तितके कमीच आहे,’’ असे पटेल यांनी नमूद केले. (क्रीडा प्रतिनिधी)