शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे कसोटी: गोलंदाजांचा टिच्चून मारा, कांगारूंच्या शेपटाची वळवळ

By admin | Updated: February 23, 2017 16:54 IST

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर कांगारूंच्या संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडतानाही नाकीनऊ

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23- भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर कांगारूंच्या संघाला  250 धावांचा टप्पा ओलांडतानाही नाकीनऊ आले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 9 गडी बाद 256 धावा केल्या आहेत. शेवटच्या गड्यासाठी मिचेल स्टार्क आणि जॉश हेझलवूड यांनी 51 धावांची भागीदारी रचत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यास मदत केली. 
 
ऑस्ट्रेलियाकडून सलामिवीर एम. रेनशॉ आणि तळाचा खेळाडू मिचेल स्टार्क व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मिचेल मार्श अर्धशतक फटकावून 57 धावांवर खेळत आहे. तर  रेनशॉने 68 धावांची खेळी केली. अश्विनने त्याला मुरली विजयकडे झेल देण्यास भाग पाडले. भारताकडून उमेश यादवने भेदक मारा करत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 2 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.  जयंत यादवनेही एक विकेट मिळवली.   
 
त्यापुर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने घेतला होता. सलामीविर डेव्हिड वॉर्नर आणि  एम. रेनशॉ यांनी संघाला सावध सुरूवात करून दिली. मात्र, लंचपूर्वी 28 व्या षटकात उमेश यादवने डेव्हिड वॉर्नरला (38) त्रिफळाचीत करत भारताला मोठं यश मिळवून दिलं.  पुढच्याच चेंडूवर दुसरा सलामिवीर  रेनशॉ(36) हा रिटायर्ड हर्ट झाला.  त्यानंतर मात्र कांगारूंचे ठरावीक अंतराने गडी बाद होत गेले. चार विकेट पडल्यावर रेनशॉ पुन्हा खेळायला आला मात्र चांगली भागीदारी रचण्यात कांगारूंना अपयश आलं.  
 
गेल्या तब्बल 19 सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केलेल्या भारतीय संघाचं या सामन्यात पारडं जड मानलं जात आहे.  ही लढत जिंकून विजयी मालिका कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे भारताच्या भूमीवर तब्बल एक तपानंतर विजयी पताका फडकवण्यासाठी कांगारू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. 
 
कर्णधार विराट कोहलीचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या संघाने अलीकडे बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांना पाणी पाजले आहे. 2015  पासून भारताने सलग 6 मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. ही मालिका जिंकून सातवी मालिकाही खिशात घालण्यासाठी भारत  प्रयत्नशील असणार आहे.