शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे- गुजरातची गोलंदाजी कमकुवत

By admin | Updated: April 15, 2017 04:29 IST

आयपीएलमध्ये यंदा आता कुठे संघांचा खेळ बहरायला लागला. पुणे आणि गुजरात संघ मात्र कुठल्यातरी गर्तेत पडल्यासारखे वाटतात. या दोन्ही संघांत एकापेक्षा

 - रवि शास्त्री लिहितात...आयपीएलमध्ये यंदा आता कुठे संघांचा खेळ बहरायला लागला. पुणे आणि गुजरात संघ मात्र कुठल्यातरी गर्तेत पडल्यासारखे वाटतात. या दोन्ही संघांत एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत, पण गोलंदाजी कमकुवत आहे. पंजाबला देखील या समस्येचा सामना करावा लागू शकतो, अशी शंका येते. बेंगळुरु संघ याच समस्येने ग्रस्त होता. पण त्यांनी यावर तोडगा काढला. डिव्हिलियर्स आणि कोहली परतल्यामुळे आक्रमकतेचा संचार झाला.अन्य संघांमध्ये मुंबई आणि केकेआर स्पर्धेत चांगली पकड निर्माण करताना दिसतात. मुंबईकडे तीन युवा खेळाडू आहेत. हे सर्वजण सलग चांगली कामगिरी करीत असून युवा ब्रिगेडने अनेक गोलंदाजांचा समाचार घेतला. पांड्याबंधूंशिवाय नीतिश राणा प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला. डिंडा आणि बोल्ट यांना या युवा फलंदाजांनी सर्वाधिक दणका दिला.दिल्ली डेअरडेव्हिल्स हा संघ देखील युवा खेळाडूंमुळे वरचढ ठरू शकतो किंवा तळाला जाऊ शकतो. दिल्लीची फलंदाजी पूर्णपणे युवा खेळाडूंच्या कामगिरीवर विसंबून आहे. संजू सॅमसनने तर योगदान दिले पण अन्य फलंदाज अद्याप ‘क्लिक’ झालेले नाहीत. या संघाच्या गोलंदाजांना बचाव करता याव्यात इतक्या धावा फलंदाजांनी काढायलाच हव्यात. ब्रेथवेट, अ‍ॅण्डरसन, मॉरिस हे धावा काढू शकतात.सनरायजर्स हैदराबाद पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीसाठी सज्ज आहे. डेव्हिड वॉर्नर एकट्याच्या बळावर विजय मिळवून देऊ शकत नसल्यामुळे शिखर धवन आणि युवराजसिंग यांच्याकडूनही प्रत्येक सामन्यात यशस्वी कामगिरीची संघाला अपेक्षा असेल. प्रत्येक संघाच्या संतुलनाच्या आधारे मी हे अवलोकन केले आहे. मुंबई आणि कोलकाता हे प्रत्येक पर्वातील यशस्वी संघ आहेत. त्यामागे अनेक कारणे देता येतील. दोन्ही संघ वारंवार चांगला खेळ करतात. जवळपास दोन महिने चालणाऱ्या आयपीएलमध्ये सातत्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे. (टीसीएम)