शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पंच रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी

By admin | Updated: February 13, 2016 01:32 IST

पाकिस्तानचे पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिस्तपालन समितीने त्यांना भ्रष्टाचार आणि फिक्सिंगमध्ये दोषी धरले आहे.

मुंबई : पाकिस्तानचे पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिस्तपालन समितीने त्यांना भ्रष्टाचार आणि फिक्सिंगमध्ये दोषी धरले आहे. आयसीसी एलिट पॅनलचे सदस्य तसेच कसोटी पंच असलेले ५९ वर्षांचे रौफ हे आयपीएलच्या २०१३ च्या सत्रात सट्टेबाजांकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याच्या आणि आयपीएल सामने फिक्स करण्याच्या आरोपात दोषी आढळले. रौफ यांच्या भविष्याचा निर्णय अनेक आठवडे लांबणीवर पडला होता. अखेर बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखालील समितीने शुक्रवारी त्यांच्यावर बंदी घालण्याची घोषणा केली. या समितीत ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शाह यांचा समावेश आहे. रौफ यांच्यावर आरोप झाल्यानंतर पाकने त्यांची आयसीसी एलिट पॅनलमधून उचलबांगडी केली होती.बैठकीनंतर बीसीसीआयने जे प्रसिद्धीपत्रक काढले त्यात, ‘पंच रौफ हे पाच वर्षे कुठल्याही प्रकारचे पंचाचे काम करणार नाहीत, क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणार नाहीत आणि बोर्ड व त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थांशी संधंबित राहू शकणार नाहीत,’ असे म्हटले आहे. रौफ हे समितीपुढे हजर झाले नव्हते पण त्यांनी आपले पहिले उत्तर १५ जानेवारी रोजी आणि नंतर लेखी उत्तर ८ फेब्रुवारी २०१६ रोजी सादर केले होते. समितीने तपास समितीचा अहवाल तसेच रौफ यांचे उत्तर विचारात घेतल्यानंतर त्यांना बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या कलम २.२.२, २.३.२, २.३.३ आणि २.४.१ अंतर्गत दोषी धरले. याशिवाय त्यांना गुप्त माहिती इतरांना पुरविल्याच्या आरोपात दोषी धरण्यात आले आहे. रौफ यांच्यावर बंदी घालताच २०१३ पासून सुरू असलेली बोर्डाची कारवाई संपली आहे. (वृत्तसंस्था)