शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पुजारामुळे काम सोपे - विजय

By admin | Updated: March 19, 2017 02:16 IST

दडपण झुगारण्याच्या चेतेश्वर पुजाराच्या क्षमतेमुळे अन्य फलंदाजांना नैसर्गिक खेळ करणे सोपे होते, अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने व्यक्त केली.

रांची : दडपण झुगारण्याच्या चेतेश्वर पुजाराच्या क्षमतेमुळे अन्य फलंदाजांना नैसर्गिक खेळ करणे सोपे होते, अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने व्यक्त केली. पुजाराने आज दिवसभर फलंदाजी करताना नाबाद १३० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला दिवसअखेर ६ बाद ३६० धावांची मजल मारता आली. पुजाराची प्रशंसा करताना विजय म्हणाला,‘पुजाराला दडपणाखाली चांगली कामगिरी करण्याची सवय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवता येतो. त्यामुळे आपल्याला नैसर्गिक खेळ करता येतो. आम्ही दोघेही फॉर्मात असल्यामुळे संघाला मदत झाली.’विजय व पुजारा यांनी पहिल्या सत्रात दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. विजय पुढे म्हणाला,‘या लढतीत उभय संघ सध्या बरोबरीत आहेत. आम्ही लक्ष्यासमीप पोहोचलो किंवा आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरलो तर लढत रंगतदार होईल. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी आज अचूक मारा केली. मी पुजारासोबत याबाबत चर्चाही केली.’विजय म्हणाला, ‘आम्ही जर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरलो तर दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात चांगल्या धावा फटकावता येतील, असे आमचे मत होते. जर मी बाद झालो नसतो तर आमची स्थिती यापेक्षा चांगली असती.’कमिन्सबाबत बोलताना विजय म्हणाला, ‘कमिन्सने आज सुरुवातीपासून चांगला मारा केली. सुरुवातीचा त्याचा स्पेल भेदक होता. तो एकाच टप्प्यावर मारा करीत होता. विकेट गेल्यानंतर त्याच्यात उत्साह संचारला.’ (वृत्तसंस्था)