शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांचा फ्रेंचायसींना फटका : प्रीती झिंटा

By admin | Updated: April 21, 2016 04:16 IST

दर वर्षी आयपीएलमधील समस्या वाढत आहेत. याचा थेट फटका सहभागी फ्रेंचायसींना बसत असल्याची तक्रार किंग्स इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा हिने केली आहे.

नवी दिल्ली : दर वर्षी आयपीएलमधील समस्या वाढत आहेत. याचा थेट फटका सहभागी फ्रेंचायसींना बसत असल्याची तक्रार किंग्स इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा हिने केली आहे. या लोकप्रिय लीगचा ब्रॅन्ड आणि यातील कमाईमुळे ही स्पर्धा तपास यंत्रणेचे ‘टार्गेट’ बनत चालल्याचे मत प्रीतीने व्यक्त केले.महाराष्ट्रातील दुष्काळामुळे आयपीएलचे १३ सामने राज्याबाहेर हलविण्यात आले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रीती म्हणाली, ‘‘यामुळे ब्रॅन्डवर विपरीत परिणाम झाला आहे. संघ मालकांसाठी हा तोट्याचा सौदा आहे. दर वर्षी कुठला तरी वाद किंवा अफवा पसरत असल्याने आयपीएल आता टार्गेट होत असल्याचे माझे मत आहे.’’ २०१३ मध्ये आयपीएलला ‘स्पॉट फिक्सिंग’चा सामना करावा लागला. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे या स्पर्धेचा पहिला टप्पा सौदी अरब अमिरातमध्ये स्थानांतरित करण्यात आला.न्यायपालिकेवर माझा १०० टक्के विश्वास आहे. पण मी जनहित याचिका दाखल करणाऱ्यांना विचारते, की दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील समस्या सोडविण्यासाठी आपण काय केले? राज्यातील वृद्धांच्या समस्या सोडविण्यासाठी मी खूप काम केले आहे. समाजाप्रती माझी जबाबदारी स्वीकारून मी ही मोहीम राबविली. किंग्स पंजाबची मालकीण किंवा चित्रपट अभिनेत्री या नात्याने मी फॅशन म्हणून काम केले नाही, हे स्पष्ट करू इच्छिते.- प्रीती झिंटा