शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

प्रणय, श्रीकांत उपांत्य फेरीत

By admin | Updated: June 17, 2017 02:57 IST

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणय याने इंडोनेशियन बॅडमिंटन सुपर सिरीजमध्ये मोठा उलटफेर केला आहे. त्याने रियो आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या

जकार्ता : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणय याने इंडोनेशियन बॅडमिंटन सुपर सिरीजमध्ये मोठा उलटफेर केला आहे. त्याने रियो आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चेन लोंग याला पराभूत करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तर किदाम्बी श्रीकांत याने तैवानच्या जु वेई वांग याच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवत अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. भारताचा एच.एस. प्रणय या स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने गुरुवारी आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या आणि जागतिक पातळीवर अव्वल रँकिग असलेल्या ली चोंग वेई याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता पुन्हा एकदा प्रणयने अशाच कामगिरीची पुनरावृत्ती केली. त्याने आॅलिम्पिक सुवर्ण विजेत्या आणि आठव्या मानांकित चिनी खेळाडू चेन लोंगला पराभूत केले. एक तास १५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणय याने २१-१८,१६-२१,२१-१९ असा विजय मिळवला. या लढतीत पहिला गेम प्रणय याने सहज जिंकला. त्याने सुरुवातीलाच घेतलेल्या आघाडीचा फायदा त्याला मिळाला. मात्र दुसऱ्या गेममध्ये चेन लोंग याने पुनरागमन केले. त्याने प्रणयवर आघाडी घेत दुसरा गेम जिंकला, त्यामुळे सामना तिसऱ्या आणि निर्णायक गेमपर्यंत खेचला गेला. अखेरचा गेम प्रणय याने २१-१९ असा जिंकत सामना खिशात घातला. २५ वे रँकिंग असलेल्या प्रणय याने पात्रता फेरीतून स्पर्धेत प्रवेश नक्की केला आहे. त्याला चेन लोंग याच्यासोबत याआधी झालेल्या तिन्ही लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता. आज त्याने लोंग विरुद्धचा पहिला विजय नोंदवला. तसेच या सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदा प्रवेश केला आहे. भारताच्याच किदाम्बी श्रीकांत याने तैवानच्या जु वेई वांग याला २१-१५, २१-१४ असे पराभूत करत अंतिम चारमध्ये जागा निश्चित केली. श्रीकांत याने या सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. त्याने वांग याला प्रतिकाराची संधीदेखील मिळू दिली नाही. दोन्ही गेममध्ये मोठी आघाडी घेत त्याने विजय मिळवला. प्रणयची पुढची लढत जपानचा काजुमासा सकाई आणि इंग्लंडचा राजीव ओसफ यांच्यातील विजेत्यासोबत होईल. तर श्रीकांतचा उपांत्य फेरीतील सामना कोरियाच्या दुसऱ्या मानांकित साने वान याच्याशी होणार आहे. (वृत्तसंस्था)आजचा सामना कठीण होता. मात्र मला आपण चांगला खेळ करू, असा विश्वास होता. मला वाटते की चांगल्या फिटनेसमुळे मी अखेरपर्यंत खेळू शकलो. इंडिया ओपन आणि एशिया बॅडमिंटननंतर प्रशिक्षक मुलयो हांडोयो यांच्या मार्गदर्शनात फिटनेसवर काम केले. त्याचा चांगला परिणाम जाणवत आहे. - एच.एस. प्रणय