शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रणीत, जयराम उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2015 00:52 IST

भारताचा बी. साई प्रणीत आणि अजय जयरामने पुरुष एकेरीत अनुक्रमे श्रीलंकेचा निलुका करुणारत्ने आणि इंडोनेशियाचा विष्णू युलीचा पराभव

कालगेरी (कॅनडा) : भारताचा बी. साई प्रणीत आणि अजय जयरामने पुरुष एकेरीत अनुक्रमे श्रीलंकेचा निलुका करुणारत्ने आणि इंडोनेशियाचा विष्णू युलीचा पराभव करून कॅनडा ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे महिला दुहेरीत भारताची ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा आणि प्रज्ञा गद्रे व एन. सिक्की रेड्डी या जोड्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीमधील आपली जागा निश्चित केली.या स्पर्धेत १०वे मानांकन असलेल्या प्रणीतने निलुका करुणारत्नेला ५७ मिनिटांत १४-२१, २१-१५, २१-१५ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ३३ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणीतची पुढच्या फेरीतील लढत आॅलिंपिक कास्यपदकविजेता व जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू ली जोंग वेईविरुद्ध होणार आहे. नवव्या मानांकन जयरामने इंडोनेशियाच्या विष्णूला २१-१२, १७-२१, २१-१२ असे नमविले. महिलांच्या दुहेरीत भारताची अव्वल जोडी ज्वाला आणि अश्विनी यांनी नेदरलॅँडच्या समंथा बार्निंग व इरिस टेबलिंग जोडीला १६-२१, २१-१६, २१-१७ असे पराभूत केले. ज्वाला-अश्विनी जोडीचा पुढील सामना २०११ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदक जिंकलेल्या हॉँगकॉँगच्या चान काका सज का व युपन सिन यिंग या जोडीबरोबर होईल. दुसऱ्या महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रे व एन. सिक्की रेड्डी जोडीने जर्मनीच्या योहान गोलिसजेवस्की व कार्ला नेल्टे जोडीला सरळ दोन सेटमध्ये २१-१५, २१-१२ असे पराभूत केले. भारताचा आनंद पवारला पुरुष एकेरीत चीनच्या शुए सोंगने १५-२१, १३-२१ व महिला एकेरीत तन्वी लाडला कॅनडाच्या मिशेल लीकडून १४-२१, १३-२१ असे पराभूत व्हावे लागले. (वृत्तसंस्था)