शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

सराव सामना : भारताकडून विंडीज ४५ धावांनी पराभूत

By admin | Updated: March 11, 2016 03:46 IST

रोहित शर्माने नाबाद ९८ धावांची आक्रमक खेळी आणि नंतर मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा व हार्दिक पंड्याने घेतलेल्या विकेटच्या जोरावर भारताने सराव सामन्यात वेस्ट इंडीजचा ४५ धावांनी पराभव केला.

कोलकाता : फॉर्मात असलेल्या रोहित शर्माने नाबाद ९८ धावांची आक्रमक खेळी आणि नंतर मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा व हार्दिक पंड्याने घेतलेल्या प्रत्येकी दोन विकेटच्या जोरावर भारताने सराव सामन्यात वेस्ट इंडीजचा ४५ धावांनी पराभव केला. ईडन गार्डनच्या मैदानावर झालेल्या या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८५ धावांपर्यंत मजल मारली. विंडीजला दिलेल्या १८६ धावांच्या आव्हानाला उत्तर देताना त्यांचा डाव १९.२ षटकांत १४० धावांत संपुष्टात आला. त्यांच्या जॉनसन चार्ल्सने १८, ख्रिस गेलने २०, मर्लोन सॅम्युअल्सने १७, डे्वेन ब्रावोने १३, आंद्रे रसेलने १९ धावा केल्या. त्यांचा जैसन होल्डर १३ धावा काढून नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद शमीने ३० धावांत २, पवन नेगीने १५ धावांत २, रवींद्र जडेजाने २६ धावांत २ व हार्दिक पंड्याने २५ धावांत दोन विकेट घेतल्या. तत्पूर्वी, भारताने ६ बाद १८५ धावा केल्या. सलामीला फलंदाजीस येऊन रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत ५७ चेंडूत ९ चौकार व ७ षटकार ठोकून ९८ धावा करून नाबाद राहिला. त्याच्याबरोबर शिखर धवनने १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार मारून २१ धावा केल्या. नंतर युवराजसिंगने २० चेंडूत ३ चौकार व १ षटकारासह ३१ धावा केल्या. रोहित व युवराजने तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडीजकडून टेलर व बेनने प्रत्येकी दोन बळी घेतले. (वृत्तसंस्था) संक्षिप्त धावफलक : भारत : ६ बाद १८५ (रोहित शर्मा नाबाद ९८, शिखर धवन २१, युवराजसिंग ३१, रवींद्र जडेजा १०, टेलर २/२६, बेन २/३०); वेस्ट इंडीज : १९.२ षटकांत सर्वबाद १४० (जॉनसन चार्ल्स १८, ख्रिस गेल २०, मर्लोन सॅम्युअल्स १७, डे्वेन ब्राव्हो १३, आंद्रे रसेल १९, जैसन होल्डर नाबाद १३, हरभजन १/१२, शमी २/३०, बुमराह १/६, नेगी २/१५, जडेजा २/२६, पंड्या २/२५)