शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

अव्वल दहामध्ये स्थान मिळवणार -पोनप्पा

By admin | Updated: July 6, 2015 01:15 IST

कॅनडा ओपनमध्ये ज्वाला गुट्टाच्या साथीने जेतेपद पटकावणारी बॅडमिंटनपटू आश्विनी पोनप्पाने रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणे आणि त्या दरम्यान अव्वल १०मध्ये स्थान पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : कॅनडा ओपनमध्ये ज्वाला गुट्टाच्या साथीने जेतेपद पटकावणारी बॅडमिंटनपटू आश्विनी पोनप्पाने रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणे आणि त्या दरम्यान अव्वल १०मध्ये स्थान पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे. आश्विनी म्हणाली, ‘आॅलिम्पिकमध्ये अव्वल १६ जोड्या पात्र ठरणार असून आम्हाला अव्वल १३ मध्ये स्थान मिळवावे लागेल. अव्वल १० मध्ये स्थान मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याची प्रक्रिया मे महिन्यापासून प्रारंभ झाली असून पुढील वर्षी मे महिन्यात संपणार आहे. काही स्पर्धा शिल्लक आहेत, पण अखेरच्या क्षणापर्यंत काही सांगता येणार नाही. अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे.’आश्विनी म्हणाली, ‘जेव्हा २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती, तेव्हा आम्हाला इंडियन ओपनपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. आम्ही उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालो असतो तर अपात्र ठरलो असतो.’ज्वाला व आश्विनी यांची जोडी सध्या जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी आहे. त्यांच्यासाठी पहिली प्रतिष्ठेची स्पर्धा पुढील महिन्यात जकार्तामध्ये होणारी विश्व चॅम्पियनशिप आहे. या स्पर्धेत आमची जोडी विजयासाठी प्रयत्नशील आहे, असेही आश्विनी म्हणाली. यापूर्वी ज्वाला-आश्विनी जोडीने २०११ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते.