शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा विश्वास; टीम इंडिया जिंकणार

By admin | Updated: February 13, 2015 00:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला १४ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या विश्वकप स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ‘खेलो दिलसे, वर्ल्ड कप लाओ फिरसे’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी संघाला शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतविजेत्या भारतीय संघाला १४ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या विश्वकप स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ‘खेलो दिलसे, वर्ल्ड कप लाओ फिरसे’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी संघाला शुभेच्छा दिल्या. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्याच्या निर्धाराने दाखल झालेल्या भारतीय संघातील सर्वच खेळाडूंना मोदी यांनी वेगवेगळा शुभेच्छा संदेश पाठविला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया १५ फेब्रुवारी रोजी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शैलीमध्ये कर्णधार धोनीला संदेश पाठविला, ‘‘माझ्या शुभेच्छा, कॅप्टन कुल धोनीसाठी! मेहनत करा आणि भारताला गौरवाची संधी प्रदान करा. चांगले नेतृत्व प्रदान कर. यात तू यशस्वी ठरशील, अशी मला आशा आहे.’’पंतप्रधानांनी सोशल नेटवर्किंग साईट टिष्ट्वटरवर प्रत्येक खेळाडूच्या नावाने संदेश पोस्ट केले. संघाचा उपकर्णधार विराट कोहलीला पंतप्रधानांनी संदेश पाठविला, की ‘संघाचा स्टार खेळाडू विराटला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. भारतीयांना तुझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.’ वन-डेमध्ये एका डावात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम नोंदविणाऱ्या रोहित शर्माला पंतप्रधानांनी म्हटले, की ‘वन-डेमध्ये दोन द्विशतकी खेळी करणारा एकमेव फलंदाज, तुझे लाखो चाहते आहेत. तू पुन्हा आम्हाला आनंद साजरा करण्याची संधी द्यावी, अशी आमची इच्छा आहे.’ (वृत्तसंस्था)