शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंच्या वेतनाची रक्कम सार्वजनिक होणार

By admin | Updated: December 18, 2015 03:17 IST

कामात पारदर्शीपणा आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीसीसीआयने आयपीएलमधील रिटेन खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनाची रक्कम सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून

नवी दिल्ली : कामात पारदर्शीपणा आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीसीसीआयने आयपीएलमधील रिटेन खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनाची रक्कम सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून फॅ्रन्चायसींमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली.आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नवी फ्रॅन्चायसी पुणे आणि राजकोट यांच्यासाठी रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेची माहिती बीसीसीआय वेबसाईटवर टाकण्याची घोषणा केली. ही माहिती ३१ डिसेंबरपर्यंत पहिली ट्रेडिंग विंडो संपताच उपलब्ध होईल. यामुळे रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंचे मूळ वेतन सार्वजनिक होणार आहे. फ्रॅन्चायसींच्या मते रिटेनर खेळाडूला काय मिळाले, हे जाणून घेण्याची कुणाला गरज नसते त्यामुळे रक्कम सार्वजनिक करणे योग्य नाही. अन्य खेळाडूंना हे माहिती झाले तर करारात खेळाडू उणिवा शोधतात. करारावर सह्या करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे संघात खदखद शिजते. काही विदेशी खेळाडू हे रिटेन करण्यात आलेल्या भारतीय खेळाडूंच्या तुलनेत सरस ठरतात, तेव्हा आपल्याला कामगिरीनुरुप किंमत मिळाली नसल्याची भावना त्यांच्यात वाढीस लागते. आयपीएलमध्ये काही असेही खेळाडू आहेत, की ज्यांना मोठ्या रकमा दिल्या जातात पण ती रक्कम खात्यात जमा केली जात नसल्याची चर्चा आहे. पण या गोष्टीला अधिकृत दुजोरा अद्यापही मिळालेला नाही. (वृत्तसंस्था) फ्रॅन्चायसीच्या एकूण रकमेतून १२.५० कोटी कमी होतीलफ्रॅन्चायसी संघ लिलावापूर्वी आपल्या संघात काही खेळाडू रिटेन करू शकतात. या खेळाडूंची किंमत इतरांच्या तुलनेत वेगळी असते. उदाहरण द्यायचे झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विराट कोहलीला रिटेन खेळाडू म्हणून घेत असेल तर फॅन्चायसीच्या एकूण रकमेतून १२.५० कोटी कमी होतील. पण फ्रॅन्चायसी विराटला यापेक्षा अधिक किंवा अधिक रक्कम देऊ शकते. रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची खरी कमाई सर्वसाधारण जनतेला कधीच माहिती नसते. पण जे खेळाडू लिलावास उपलब्ध असतात. त्यांच्यावर बोली लागल्याने त्यांची रक्कम मात्र जनतेला माहिती होते.