शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंची अद्याप डोप चाचणी नाही

By admin | Updated: May 27, 2015 01:29 IST

चीनमध्ये पुढील महिन्यात आयोजित आशियाई चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ तीन दिवसांनंतर रवाना होणार आहे,

नवी दिल्ली : चीनमध्ये पुढील महिन्यात आयोजित आशियाई चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ तीन दिवसांनंतर रवाना होणार आहे, पण ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्डमध्ये सहभागी होणाऱ्या किमान १० खेळाडूंची अद्याप डोप चाचणी झालेली नाही. त्यातील अनेक रिले धावपटू आहे, असे सूत्राने सांगितले. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतावर डोप चाचणी न झालेल्या खेळाडूंना पाठविण्याची वेळ येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण आता डोप चाचणी केली तरी ३० मे रोजी रवाना होण्यापूर्वी या चाचणीचा अहवाल मिळणे अशक्य भासत आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) ३ ते ७ जून या कालावधीत वुहानमध्ये होणाऱ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी २० खेळाडूंची निवड केली. त्यात रिले धावपटूंच्या (पुरुष व महिला ४ बाय १०० व ४ बाद ४०० मीटर) नावाची घोषणा बुधवारी पतियाळा व बेंगळुरू येथे होणाऱ्या चाचणीनंतर करण्यात येणार आहे.नाडाने सोमवारी चाचणीनंतर रिले धावपटूंचे डोप नमुने घेण्याची सूचना केली होती. सूत्राने सांगितले की, ‘या महिन्याच्या सुरुवातीला ज्या वेळी विश्व डोपिंगविरोधी एजन्सीची समिती चाचणीसाठी तिरुवनंतपुरममध्ये साई-एसएनसीपीईमध्ये दाखल झाली, त्या वेळी काही खेळाडू उपस्थित नव्हते. त्यात मध्यम पल्ल्याच्या धावपटूंचा समावेश होता. त्यामुळे आता त्यांची डोपिंग चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.’ नाडाच्या समितीला खेळाडूंचे डोपिंग नमुने घेता यावे यासाठी महिलांची ४ बाय ४०० मीटर रिले संघाची ट्रायल तिरुवनंतपुरममधून एनआयएस पतियाळा येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षकाचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की,‘ज्या वेळी वाडाची समिती तिरुवनंतपुरममध्ये पोहोचली, त्या वेळी मध्यम पल्ल्याचे किमान सात धावपटू उपस्थित नव्हते, हे आता जगजाहीर झालेले आहे. माहिती मिळाल्यामुळे वाडाची समिती येथे पोहोचण्याच्या एक दिवसापूर्वीच खेळाडू या केंद्राबाहेर पडले होते. एएफआयच्या अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य माहीत आहे. खेळाडूंची डोप चाचणी घेण्यासाठी त्यांनी ट्रायल तिरुवनंतपुरममधून पतियाळा येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. एनआयएस पतियाळा येथे नियमित डोपिंग परीक्षण करण्यात येते. बेंगळुरू व तिरुवनंतपुरमच्या तुलनेत तेथे चाचणीपासून बचाव करणे अधिक कठीण आहे. प्रशिक्षक पुढे म्हणाले, ‘रिले संघात कुणाची निवड होईल, याचा अंदाज घेणे कठीण नाही. त्यामुळे रिले धावपटूंचा विचार करताना आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवडण्यात येणाऱ्या संघातील किमान १० खेळाडूंची डोप चाचणी अद्याप शिल्लक आहे.’ (वृत्तसंस्था)रिले धावपटूंची डोप चाचणी बुधवारी किंवा २८ मे रोजी होईल. नाडाला डोप चाचणी समिती पाठविण्यासाठी आम्ही पत्र लिहिले आहे.’ संघ रवाना होण्यापूर्वी डोप चाचणीचा अहवाल मिळण्याबाबत विचारले असता वाल्सन म्हणाले, ‘डोप चाचणीचा अहवाल ३६ ते ४८ तासांमध्ये मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.-सी. के. वाल्सन, एएफआयचे सचिव