शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडू आत्महत्याप्रकरण दुख:द; जलद कारवाई

By admin | Updated: May 13, 2015 23:21 IST

भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात घडलेले खेळाडू आत्महत्या प्रकरण हे हृदय हेलावणारे आणि सर्वांत दुख:द असून, भविष्यात असे प्रकार घडू

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात घडलेले खेळाडू आत्महत्या प्रकरण हे हृदय हेलावणारे आणि सर्वांत दुख:द असून, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी जलद कारवाई करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने बुधवारी दिले. केरळमधील अलपुझा येथे साईच्या जलतरण केंद्रात ६ मे रोजी ४ महिला खेळाडूंनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात एका खेळाडूचा मृत्यू झाला. सर्व मुलींनी ‘ओथलंगा’ नावाचे विषारी फळ खाल्ले होते. या घटनेवर क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी लोकसभेत साईतील प्रशिक्षणव्यवस्था सुदृढ करण्यावर भर दिला. या संदर्भात साई महासंचालकाच्या शिफारशी तपासणार असल्याचे सांगितले. सोनोवाल यांच्या वतीने संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी म्हणाले, ‘‘या संदर्भात पोलीस, जिल्हा प्रशासन, राज्याच्या क्रीडा सचिवांमार्फत आणि राज्य मानवाधिकार आयोगामार्फत तपास करण्यात येत आहे. यामुळे कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. ही घटना दुख:द असून, साई प्रशिक्षण केंद्रात सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे.’’ साई महासंचालकांनी या संदर्भात अनेक उपया सुचविले आहेत. त्यांत कौन्सिलिंग मानसोपचारतज्ज्ञाच्या नियुक्तीचाही समावेश आहे. या केंद्रात योग हा विषय सक्तीचा करणे, शारीरिक शोषणाच्या तक्रारीसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू करणे आदींचा समावेश आहे. साई महासंचालकांनी विविध लोकांशी संपर्क साधल्यानंतर काही उपाययोजना सुचविल्या आहेत. उपचार घेत असलेल्या तिन्ही मुलींचे कौन्सिलिंग करणे व त्यांचे भावनिक पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तज्ज्ञांकडून ज्या सूचना आल्या आहेत, त्यांवर सरकार विचार करील; शिवाय भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कठोर कारवाई केली जाईल. साई महासंचालकांनी रुग्णालयात जाऊन तिन्ही मुलींची भेट घेतली; शिवाय मृत अपर्णा रामचंद्रन या मुलीच्या कुटुंबीयांचेदेखील सांत्वन केले. (वृत्तसंस्था)